शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तातील जवान उपचाराविना दगावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:46 IST

पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येथे बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा शुक्रवारी निमोनियाने मृत्यू झाला. नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची तुकडी पांढरकवडा बंदोबस्तासाठी गुरूवारी यवतमाळला आली.

ठळक मुद्देमोदींचा दौरा : अद्ययावत रुग्णवाहिका, डॉक्टरचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येथे बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानाचा शुक्रवारी निमोनियाने मृत्यू झाला.नागपूर येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची तुकडी पांढरकवडा बंदोबस्तासाठी गुरूवारी यवतमाळला आली. येथे रिपोर्टींग करत असतानाच जवान सचिन सुरेश मेहर (३०) बक्कल क्रमांक ३८५ रा. पवनार वर्धा यांची प्रकृती बिघडली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. व्हेंटीलेटरसोबत डायलिसीसची गरज असल्याचे मेडिकलच्या डॉक्टरांनी सांगितले. याची सुविधा यवतमाळात नसल्याने नागपूर येथे हलविण्याचा दुपारी ३ वाजता सल्ला दिला. मात्र अद्ययावत रुग्णवाहिका आणि त्यावर डॉक्टर नसल्याने सायंकाळचे सात वाजले. रुग्णसेवकांनी अधिष्ठाताकडे रुग्णवाहिकेवर डॉक्टर द्यावा, अशी मागणी केली. मात्र अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी व्हीआयपी बंदोबस्त असल्याने डॉक्टरांच्या चमू पांढरकवडा गेल्याचे सांगून असमर्थता दर्शविली. त्यानंतर रुग्णसेवकांनी एका खासगी डॉक्टरच्या मदतीने गुरूवारी रात्री सचिनला सावंगी मेघे येथे दाखल केले. मात्र विलंबामुळे त्यांची प्रकृती खालावली, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अशातच शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयीन प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे. सचिन मेहर यांना दीड वर्षाची चिमुकली, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस