शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

एन-९५ मास्कच्या नावाखाली ग्राहकांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष पाहता संशयाचे धुके निर्माण झाले आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूचा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रूग्णांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ आता नगरपालिका क्षेत्रातही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये धास्ती व भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या दहशतीचा फायदा : बनावट मास्क पांढरकवडाच्या बाजारपेठेत दाखल, दामदुपटीने केली जाते विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : संपूर्ण तालुक्यासह शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत चालला असून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती व धास्ती निर्माण झाली आहे. या बाबीचा गैरफायदा उचलत व्यावसायिकांकडून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेक केली जात असल्याचे समोर आले आहे. एन-९५ मास्कच्या नावाखाली बोगस मास्कची चढ्या दराने विक्री करून नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे.याठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष पाहता संशयाचे धुके निर्माण झाले आहे. संसर्गजन्य कोरोना विषाणूचा शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील रूग्णांच्या वाढत्या संख्येपाठोपाठ आता नगरपालिका क्षेत्रातही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये धास्ती व भीतीचे वातावरण पसरले आहे. सहाजिकच पर्यायी उपाययोजना करण्यात नागरिकांचा कल दिसून येत आहे. घराबाहेर निघताना तोंडाला मास्क लावणे जिल्हा प्रशासनाने व नगरपालिका प्रशासनाने अनिवार्य केल्यामुळे नागरिकांचा ओढा उच्च दर्जाच्या मास्क खरेदीकडे असल्याचे दिसत आहे.या सर्व बाबींचा गैरफायदा शहरातील व्यावसायिकांकडून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कसारख्याच हुबेहुब बनावट मास्कची विक्री करून ग्राहकांची मोेठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. मास्क वापरणे अनिवार्य झाल्यामुळे महिला व लहान मुलांचा ओढा रंगबिरंगी मास्क खरेदी करण्याकडे आहे. पांढरकवडा येथील बाजारपेठेत यामध्ये अवघ्या ३० रूपयांपासून ते ७० रूपयांपर्यंत विविध रंगांचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध असून त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.प्रशासकीय यंत्रणांचा कानाडोळा२०० रूपयात ट्रिपल लेअर मास्क शासनाने प्रमाणित केलेल्या एन-९५ मास्कची यापूर्वी केवळ मेडिकल स्टोअर्समधून विक्री केली जात होती. आता सरसकट जनरल स्टोअर्स, किराणा दुकानांमध्येही अशा प्रकारचे नानाविध मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये २०० रूपयात ट्रिपल लेअर मास्कची विक्री केली जात आहे. या मास्कच्या दर्जाबद्दल संबंधित विक्रेत्याला विचारणा केली असता, त्याने असमर्थता व्यक्त केली. शहरात एन-९५ च्या नावाखाली बनावट व दर्जाहीन मास्कची खुलेआम चढ्या दराने विक्री केली जात आहे. कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना सातत्याने आवाहन करणाऱ्या प्रशासनाचे या आर्थिक लुटीकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या