शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात उमेदवार कोण, याचीच उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 4:11 AM

महत्त्वपूर्ण कामे त्यांनी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वास नेली आहे.

राजेश भोजेकरचंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा राज्याचे हेवीवेट नेते अर्थ, नियोजन वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आहे. या मतदार संघातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातील. या मतदारसंघात काँग्रेसच तुल्यबळ पक्ष असला तरी त्यांना टक्कर देणारा तगडा उमेदवारच पक्षाकडे नाही. येत्या १५-२० दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी पाच वर्षांपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली आहे.

महत्त्वपूर्ण कामे त्यांनी गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर पूर्णत्वास नेली आहे. शिल्लक असलेली कामे गतीने सुरू आहे. याचाच अर्थ येत्या विधानसभा निवडणुकीत ते विकासकामे दाखवून जनतेला मते मागतील हे सर्वश्रूत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार द्यायचा झाल्यास तो त्याच तोडीचा असावा लागणार. परंतु निवडणूक जवळ येत असताना अद्याप एकही दमदार नाव काँग्रेस गोटातून पुढे आलेले नाही. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी हे पुन्हा इच्छुक आहेत, तर जागा आपल्याला मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य हे पक्षश्रेष्ठींकडे गळ घालत आहेत. काँग्रेसचे चंद्रपूर शहर अध्यक्ष नंदू नागरकर हे सुद्धा रांगेत आहेत. काँग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष संतोष रावतसुद्धा इच्छा बाळगून आहेत. बीएसपीनंतर बीआरएसपीतून बाहेर पडलेले राजू झोडेंचा आता काँग्रेस तिकीटावर डोळा आहे. बल्लारपूर तालुका माहेर असलेल्या नागपूर येथून राष्ट्रीयस्तरावर सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिला उमेदवारालाही काँग्रेस पुढे आणू शकेल, असेही बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी असली तरी ऐनवेळी हा मतदारसंघ बीएसपीला सोडला जाण्याची शक्यता आहे. जर कदाचित बीएसपीसोबत काँग्रेसची आघाडी झाली तर!पाच वर्षांत काय घडले?च् गेल्या दहा वर्षांपासून या मतदार संघाचे नेतृत्व करीत असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी या मतदार संघातील मूल, बल्लारपूर व पोंभूर्णा या तीनही तालुक्यांचा चेहरामोहरा बदलविला.च्आदिवासी भगीनींसाठी कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, दुथपिक व अगरबत्ती निर्मितीचा उद्योग उभारून त्यांना रोजगार दिलेला आहे. इतर कामेही लक्ष वेधणारी आहे.च्राजू झोडे यांनी बीएसपीनंतर बीआरएसपीमध्ये प्रवेश करून आंदोलनांच्या माध्यमातून जनतेचेलक्ष वेधले होते. बीआरएसपीलाही जयभीम करीत उलगुलान संघटना स्थापन करून काँग्रेसच्याउमेदवारीवर डोळा ठेवून आहे.च्स्थानिक स्वराज संस्था भाजपकडेच. पाच वर्षांत काँग्रेस कधीहीप्रभावीपणे पुढे येताना दिसली नाही.निवडणूक २०१४सुधीर मुनगंटीवार (भाजप)१,०३,७२८ मतेघनश्याम मुलचंदाणी (काँग्रेस)६०,११८ मतेराजेश सिंग (बसपा)१०,३४४ मतेसंभाव्य प्रतिस्पर्धीघनश्याम मुलचंदानी (काँग्रेस)नंदू नागरकर (काँग्रेस)राजेंद्र वैद्य (राकाँ)राजू झोडे (अपक्ष)निवडणूक दर पाच वर्षांनी येते. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कुठेही तडा जावू नये, असा विकास मतदार संघात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. निवडणुकीत विरोधात कुणीही असेल. त्याची तुलना मतदार संघातील जनता गेल्या पाच वर्षातील विकास कामांशी करेल.- सुधीर मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर मतदारसंघ. 

टॅग्स :yavatmal-acयवतमाळballarpur-acबल्लारपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारElectionनिवडणूक