धक्कादायक! घरजावयाने केली चौघांची हत्या, सासरा, दोन मेहुणे, बायकोला झोपेत केले ठार

By सुरेंद्र राऊत | Updated: December 20, 2023 09:45 IST2023-12-20T09:40:26+5:302023-12-20T09:45:36+5:30

मध्यरात्रीची घटना : कळंब तालुक्यातील थरार

crime news Family members killed four people, father-in-law, two brothers-in-law, wife were killed in their sleep | धक्कादायक! घरजावयाने केली चौघांची हत्या, सासरा, दोन मेहुणे, बायकोला झोपेत केले ठार

धक्कादायक! घरजावयाने केली चौघांची हत्या, सासरा, दोन मेहुणे, बायकोला झोपेत केले ठार

यवतमाळ: जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर घरजावई म्हणून राहत असल्याने झोपेत सूड उगवला. स्वतःच्या पत्नीसह सासरा व दोन मेहुणे यांची सबलाने हल्ला करून झोपेत हत्या केली. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी आहे. आरोपीला पोलीसांनी अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सासरा पंडित घोसले, मेहुणा ज्ञानेश्वर घोसले आणि  सुनील घोसले,  बायको रेखा गोविंद पवार अशी मृतांची नवे आहेत. सासू रुखमा घोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आरोपी गोविंद विरचंद पवार हा लग्नानंतर पत्नी रेखा सोबत सासुरवाडीला राहत होता, त्याला येथे सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती, यामुळेच दुखावलेल्या गोविंद ने  मंगळवारी मध्यरात्री सूड उगवला, तिरझडा गावात घरी झोपून असलेल्या पत्नी व साळ्याची हत्या केली. नंतर शेतात झोपलेल्या सासरा व साला यांच्यावर सबलाने प्रहार केले, यावेळी सासू थोडक्यात बचावली , मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. हे हत्याकांड घडल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

Web Title: crime news Family members killed four people, father-in-law, two brothers-in-law, wife were killed in their sleep