शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सट्टाबाजाराचा खायवाड मार्इंदे चौकात

By admin | Updated: May 29, 2016 02:30 IST

इंडियन प्रिमीअर लिगचा हंगाम जोरात सुरू आहे. विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सट्टा यवतमाळातून लावला जातो.

यवतमाळ : इंडियन प्रिमीअर लिगचा हंगाम जोरात सुरू आहे. विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सट्टा यवतमाळातून लावला जातो. सर्वाधिक उलाढाल येथील मार्इंदे चौकातून होत आहे. येथील खायवाड्याने ‘रान’ माजविले आहे. स्थानिक पोलीस आणि शोध पथके हितसंबंधामुळे मूकसंमती देत आहेत. शहरातील भूमाफिया आणि मद्यसम्राट म्हणून लौकिक मिळवित असलेल्यानेच आपल्याच परिवारातील व्यक्तीला क्रिकेट सट्टा बाजारात उतरविले आहे. सत्तेतील पुढाऱ्यांशी असलेली सलगी, स्थानिक अधिकाऱ्यांशी जुळलेले हितसंबंध या जोरावर विदर्भात नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सट्टा यवतमाळातून लावला जातो. जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा, पुसद या प्रमुख तालुक्याच्या ठिकाणीही मार्इंदे चौकातील खायवाड्यासाठीच उतारा घेतला जातो. एकट्या यवतमाळ शहरात क्रिकेट मॅचवर उतारवाडी करणारे शंभरजण कार्यरत आहे. व्हाईट कॉलरचा पाठिंबा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची सलगी या जोरावर आपले आगळेवेगळे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पोलीस यंत्रणेतील सर्वांनाच याची खबर असली तरी, प्रत्यक्ष कारवाईसाठी कुणीही पुढे आले नाही. उलट या यंत्रणेतील काही महाभाग क्रिकेट सट्ट्यातही भागिदार असल्याचे सांगितले जाते. क्रिकेट सट्ट्याच्या भरवशावर या खायवाडने दोन महिन्यांपूर्वी ६० लाख रुपये किमतीची आलिशान गाडीही विकत घेतली आहे. आपला आर्थिक विकास करत असतानाच गुन्हेगारी प्रवृत्तीचे टोळके जमा करून ‘मसल पॉवर’ वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. ‘मसल पॉवर’च्या जोरावरच फोनवर लावलेल्या सट्ट्याची रक्कम वसूल केली जाते. सट्टा बाजारात एकछत्री अंमलशहरातील सर्वच अवैध धंद्यांमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांना येनकेन प्रकारे मोडीत काढून आपले वर्चस्व स्थापन केले जात आहे. यामध्ये मद्यसम्राट आणि भूमाफिया असलेल्यांची आक्रमक भूमिका आहे. याच जोरावर क्रिकेट सट्टा बाजारातही एकछत्री अंमल तयार करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात इतर कोणी काम करू शकत नाही, अशी स्थिती आहे. (कार्यालय प्रतिनिधी)