यवतमाळमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 17:47 IST2018-03-10T17:47:35+5:302018-03-10T17:47:35+5:30
महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या
यवतमाळ : महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. यातील मुलगी ही अल्पवयीन असून ती इयत्ता नववीची विद्यार्थिनी होती. शनिवार सकाळी ती शाळेत गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाली. दरम्यान, सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास एक विद्यार्थिनी शाळेमागे गेली असता तिला शाळेजवळील नाल्यापलिकडील एका झाडाला तरुण लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबतची माहिती तिनं शाळेतील शिक्षकांना दिली. यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी गळफास घेतलेल्या तरुणाच्या पायाशी मुलगीदेखील निपचित पडून होती.
यानंतर तातडीनं पोलिसांनी याची माहिती देण्यात आली. महागावचे ठाणेदार डी.के.राठोड, एपीआय एस.पावरा, पीएसआय कैलास भगत आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करुन त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक केंद्रात रवाना केले. दरम्यान, घटनास्थळी उंदीर मारण्याचे औषध आढळून आले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.