शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कापूस उत्पादक शेतकरी शासकीय खरेदीवरच अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 11:27 IST

कापसाचा पेरा व वाढलेले उत्पादन, टेक्सटाईल उद्योगातील मंदी, बाजारात कापसाचे पडलेले भाव यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदीवरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसीसीआय - पणनच्या केंद्रांवर नजराहमी भावापेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता कमीच

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाचा पेरा व वाढलेले उत्पादन, टेक्सटाईल उद्योगातील मंदी, बाजारात कापसाचे पडलेले भाव यामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदीवरच अवलंबून रहावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच सीसीआय व पणन महासंघाची खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.कॉटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी कापसाचा पेरा वाढला असून उत्पादनही चांगले झाले आहे. परतीच्या पावसाने मात्र काही ठिकाणी या उत्पादनाला अडचण निर्माण केली आहे. तरीही तीन कोटी ७५ लाख रूईगाठी होण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचा बाजार मंदावला आहे. जगात केवळ भारतातच कापसाला भाव जास्त आहे. शासनाने कापसाला प्रति क्ंिवटल ५६८० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षात बाजारात ४५०० ते ४८०० रुपये भाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तमाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या कापूस खरेदी केंद्रांचाच आधार राहणार आहे. सध्या तरी सीसीआय व पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र तातडीने उघडण्याचे नियोजन दिसत नाही. वास्तविक आतापर्यंत हे केंद्र सुरु होणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी हंगामाच्या शेवटी कापसाचा भाव सहा हजारांवर गेला असला तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी केवळ व्यापाऱ्यांना झाला आहे.

गुजरातमध्ये सर्वाधिक उत्पादनगुजरातमध्ये पेरा कमी आणि उत्पादन जास्त यामुळे किमान १०० लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पेरा जास्त असूनही निसर्गाने साथ न दिल्याने ८० ते ९० लाख गाठी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सद्यस्थितीत कापसाला अवघा ३८०० ते ३९०० रुपये भाव मिळतो आहे. परतीच्या पावसाने अनेक भागात कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे.

रेशनिंगचा निकष लागण्याची भीतीशासनाचे कापूस खरेदीचे धोरण नेमके काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर खरेदीच्यावेळी ‘किती एकर क्षेत्रात पेरा होता’ हा रेशनिंगचा निकष शासनाने लावला होता. आता कापसाच्या खरेदीसाठी हा निकष लावल्यास शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पणन महासंघ सीसीआयची सबएजंसीदरवर्षी दसरा ते दिवाळी दरम्यान शासनाची कापूस खरेदी केंद्रे सुरू केली जातात. परंतु यंदा दिवाळी संपूनही अद्याप शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या प्रारंभाला मुहूर्त सापडलेला नाही. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ यावर्षी सीसीआयची (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया) सबएजंसी म्हणून काम करणार आहे. काही ठिकाणी सीसीआयचे तर कुठे पणन महासंघाचे शासकीय कापूस खरेदी केंद्र राहणार आहे.

आणखी दोन आठवडे थांबा - सीसीआयसीसीआयच्या विदर्भातील अकोला मुख्यालयाशी संपर्क केला असता कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास आणखी किमान दोन आठवडे लागणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगण्यात आले.

‘पणन’ची बैठक नोव्हेंबरमध्येपणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले की, खरेदी केंद्र उघडण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप मागणी आलेली नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पणन महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक होत असून त्यात खरेदी केंद्र केव्हा व किती सुरु करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

‘पणन’कडे ग्रेडरचा तुटवडापणन महासंघाकडे पुरेसे ग्रेडर नाहीत, त्यांची नवी भरती करता येत नाही, त्यामुळे सीसीआयला सोबत घेऊन पणन महासंघ कापूस खरेदीत उतरणार आहे. राज्यात किमान ५० खरेदी केंद्र पणन महासंघ सुरू करणार आहे. एकट्या यवतमाळ विभागात पणन महासंघाचे यवतमाळ, कळंब, पुसद, आर्णी, उमरखेड येथे पाच खरेदी केंद्र राहणार आहे. सीसीआयने काही केंद्रांवर यावेळी कापूस खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पणन महासंघ कापूस खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी