शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकावर फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: June 5, 2017 01:17 IST

कमी पैशात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या येथील काँग्रेस नगरसेवकासह दोघांवर यवतमाळ शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

एकास अटक : बनावट सोने, तीन लाख लाटले लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कमी पैशात सोने देण्याची बतावणी करणाऱ्या येथील काँग्रेस नगरसेवकासह दोघांवर यवतमाळ शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. या दोघांनी दारव्हा येथील व्यापाऱ्याला बनावट सोने देऊन तीन लाखांने गंडा घातल्याचा आरोप आहे. येथील काँग्रेसचे नगरसेवक सलीम सागवान व मो. नईम मो. फकरुला (४४) दोघे रा. यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी दारव्हा येथील युवक गणेश माधवराव भवर (३४) याला सहा लाखांत एक किलो सोने विकायचे असल्याची बतावणी केली. कमी पैशात सोने मिळत असल्याने गणेश त्यांच्या जाळ्यात अडकला. या सोने खरेदीचा व्यवहार ठरल्यानंतर २५ मे रोजी दुपारी १ वाजता आरोपींनी आरटीओ कार्यालयाजवळ गणेशला बोलाविले. तिथे ठरल्याप्रमाणे सहा लाखांपैकी तीन लाख रुपये रोख देण्यात आले. नंतर आरोपींनी गणेशला नगरपरिषद कार्यालयाजवळ बोलाविले. तेथे तीन लाखांच्या मोबदल्यात अर्ध्या किलो सोने दिले. मात्र गणेशला या सोन्याबद्दल संशय आला. त्याने या सोन्याची तपासणी केली. मात्र ते सोने बनावट असल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शनिवारी गणेश भवर याने यवतमाळ शहर ठाणे गाठले. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी रात्री १२ वाजता गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणातील आरोपी मो.नईम मो. फकरुला याला त्याच्या घरुन अटक करण्यात आली. तर यातील मुख्य आरोपी नगरसेवक सलीम सागवान पसार असल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. यापूर्वीसुद्धा नगरसेवक सलीम सागवान यांच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कमी किंमतीत सोने विकण्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले असून त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे.