शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा चढउतार वाढवतोय जिल्ह्याची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 05:00 IST

जून महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यात रुग्णवाढ रोडावली आहे. परंतु, संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. दररोज दहा ते पंधरा रुग्ण आढळत आहेत. तर एक-दोन दिवसाआड एखाद्या रुग्णाचा मृत्यूही नोंदविला जात आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून संपूर्ण अनलाॅक करण्यात आले आहे. सर्व व्यवहार निर्बंधांशिवाय सुरळीत सुरू आहेत. परंतु, रुग्ण आढळण्याचा रतीब कमी झाला तरी कायम आहे.

ठळक मुद्देरुग्ण घटले, पण संसर्ग सुरूच : एक-दोन दिवसाआड होतेय मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली आहे. मात्र कोरोना संपलेला नाही. उलट संख्या कमी असली, तरी रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात चढउतार नोंदविला जात आहे. त्यामुळे थाेडेसेही दुर्लक्ष अंगलट येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.जून महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यात रुग्णवाढ रोडावली आहे. परंतु, संसर्ग पूर्णपणे संपलेला नाही. दररोज दहा ते पंधरा रुग्ण आढळत आहेत. तर एक-दोन दिवसाआड एखाद्या रुग्णाचा मृत्यूही नोंदविला जात आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून संपूर्ण अनलाॅक करण्यात आले आहे. सर्व व्यवहार निर्बंधांशिवाय सुरळीत सुरू आहेत. परंतु, रुग्ण आढळण्याचा रतीब कमी झाला तरी कायम आहे. रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मात्र एक-दोन दिवसाआड हे दोन्ही आकडे वाढताना-उतरताना दिसत आहेत.

रविवारी ११ पाॅझिटिव्ह, ३९ कोरोनामुक्त- रविवारी जिल्ह्यात ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर ३९ जण कोरोनामुक्त झाले. पाॅझिटिव्ह आलेल्या ११ जणांमध्ये दारव्हा येथील एक, घाटंजी दोन, महागाव एक, पुसद दोन, वणी चार व यवतमाळ येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार शुक्रवारी एकूण ८९० पैकी ८७९ अहवाल निगेटिव्ह आले. सध्या जिल्ह्यात ८२ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७२ हजार ६३६ आहे. तर बरे झालेल्यांची एकूण संख्या ७० हजार ७६८ इतकी आहे. एकूण १७८६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सहा लाख ७३ हजार १४ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी सहा लाख ३३१ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर १०.७९ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १.२४ आहे. तर मृत्युदर २.४६ टक्के आहे.

सध्या आपल्याकडे कोरोनाचे नगण्य रुग्ण आहे. जे रुग्ण ॲडमिट आहे, त्यांना पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याशिवाय आपण घरी पाठवतच नाही. कोरोना संसर्गाचा चढउतार आपण यापूर्वीही पाहिला आहे. त्यामुळे सध्या रुग्ण कमी झाले असले तरी सर्वांनी शंभर टक्के लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची त्रिसूत्रीही पाळली पाहिजे.- डाॅ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या