शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे मृत्यूसत्र थांबता थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र सुरूच आहे. त्यात शनिवारी आणि रविवारी आणखी चौघांची भर पडली. त्यामुळे ...

ठळक मुद्देपुन्हा चार बळी : रुग्णसंख्येत ९० जणांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे मृत्यूसत्र सुरूच आहे. त्यात शनिवारी आणि रविवारी आणखी चौघांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची एकंदर बळी संख्या ६१ झाली आहे. तर दोन दिवसात ९० पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७७ झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकंदर दोन हजार १६८ रुग्णांची नोंद झाली आहे.स्वातंत्र्य दिनी शनिवारी जिल्ह्यात ६० नवे रुग्ण आढळून आले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ रविवारीही ३० रुग्ण आणि दोन मृत्यू अशी आकडेवारी समोर आली. रविवारी यवतमाळ शहरातील ६० वर्षीय आणि सेवानगरातील ६२ वर्षीय अशा दोन महिलांचा मृत्यू झाला. तर नव्याने आढळलेल्या ३० रुग्णांमध्ये १६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील वडगाव, पाटीपुरा येथील प्रत्येकी एक पुरुष, वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक महिला व शहराच्या अन्य भागातील दोन पुरुषांसह तीन महिलांचा समावेश आहे. पुसद शहरात १४, पांढरकवडा शहरात एक, नेर तालुक्यात पिंपरी आणि वटफळी येथे प्रत्येकी एक, वणी शहरात पाच रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.रुग्णसंख्या वाढत असताना उपचारांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रविवारी आणखी १६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आढळलेल्या एकंदर दोन हजार १६८ रुग्णांपैकी आतापर्यंत एक हजार ४३० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डात १३५ जणांवर उपचार सुरू आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी आणखी ६३ स्वॅब नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले. आजवर पाठविलेल्या एकंदर ३४ हजार ३०४ नमुन्यांपैकी ३३ हजार ९३५ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३१ हजार ७६७ नागरिकांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर ३६९ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.कोरोना रुग्णांचे ‘पॉझिटिव्ह’ देशप्रेमकोरोनासारख्या भयंकर आजाराने ग्रासल्यावरही देशाच्या आरोग्य सेवेने लाखो लोकांना जीवदान दिले. याबाबतची कृतज्ञता रुग्णांच्या मनात ठासून भरली आहे. त्याचाच प्रत्यय शनिवारी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डात आला. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी उत्स्फूर्तपणे राष्टÑगीत गाऊन राष्टÑप्रेम सिद्ध केले. येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वार्डात दीडशे कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. यंदा कोरोनामुळे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर मर्यादा आल्या. शासकीय कार्यालयांमध्येही मर्यादित उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. याची खंत खुद्द कोरोना रुग्णांच्या मनातही आहे. ज्या देशाची यंत्रणा आपल्यासाठी अहोरात्र झटत आहे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी रुग्णांनी बरोबर हेरली. शनिवारी सकाळी ९ वाजता आपआपल्या बेड शेजारी उभे राहून शिस्तीत प्रत्येकाने सामूहिकपणे राष्टÑगीताचे गायन केले. त्यानंतर भारत माता की जय अशा घोषणाही दिल्या. हा प्रसंग मोबाईलमध्ये चित्रित करून एका रुग्णाने मित्रांना पाठविला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या