शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास साडेनऊ लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अजूनही २० लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ज्या व्यक्तींनी लसीकरण केले नाही, अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिक लसीकरणासाठी  केंद्रांवर गर्दी करीत असतानाच बुधवारी हा प्रकार घडल्याने अनेकांना या केंद्रांवरून रिकाम्या हाताने परतावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरून उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यासाठी लसीकरण मोहिमेला गती देणे आवश्यक आहे. त्यामुळेच जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असतानाच लसीकरणासाठीची नोंदणी करणाऱ्या तब्बल १७५ ऑपरेटरला अचानक कामावरून कमी केल्याने बुधवारी यवतमाळ शहरासह विविध ठिकाणची लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. प्रशासनाच्या या कारभाराबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठीचा निधी कमी केल्याने  लसीकरण मोहिमेवरील रोजंदारीवरील १७५ कर्मचाऱ्यांचे २४ ऑगस्टपासून काम थांबविण्यात आले आले. यामध्ये ऑपरेटरचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑपरेटरच्या नोंदणीशिवाय लसीकरण होत नाही. याची माहिती असतानाही याबाबतची कार्यवाही झाल्याने बुधवारी शहरात गोंधळ उडाला.  यवतमाळ जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ११ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास साडेनऊ लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. अजूनही २० लाख नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे ज्या व्यक्तींनी लसीकरण केले नाही, अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे नागरिक लसीकरणासाठी  केंद्रांवर गर्दी करीत असतानाच बुधवारी हा प्रकार घडल्याने अनेकांना या केंद्रांवरून रिकाम्या हाताने परतावे लागले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने कर्मचाऱ्यांची आवश्यकता नसल्याचे कारण पुढे करीत लसीकरण केंद्रातील ऑपरेटरची नियुक्ती थांबविण्यात आल्याचे समजते. हे सर्व ऑपरेटर लसीकरण केंद्रावर येणाऱ्या व्यक्तींची ऑनलाइन नोंद करीत होते. यानंतर प्रत्यक्ष लसीकरणासाठी त्यांची नोंद होत होती. बुधवारपर्यंत काम करण्याचे आदेश या ऑपरेटर मंडळींना होते. रोजंदारीने असलेले हे कर्मचारी नियुक्ती आदेश नसल्याने गुरुवारी केंद्रावर आले नाहीत. यामुळे या केंद्रांवर लस पोहोचल्यानंतर ऑनलाइन नोंद करण्यासाठी कुणीच कर्मचारी नसल्याने केवळ ६५ केंद्रांवर एमपीडब्ल्यू आणि गटप्रवर्तकाने लसीकरण केले.  सरासरी दोन हजार ते ५० हजारापर्यंत एका दिवशी लसीकरण झाल्याची नोंद लसीकरण विभागात झाली आहे. गुरुवारी मात्र ही लस उपलब्ध असतानाही ऑपरेटरअभावी लसीकरण मोहीम थांबल्याचे चित्र होते.  या लाभार्थींना दुसऱ्या दिवशी येण्याच्या सूचना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या. 

केंद्र शासन आणि राज्य शासनाने फंडींग बंद केले आहे. राज्य शासनाच्यावतीने लवकरच डाटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्याला १०४ नवीन डाटा एन्ट्री ऑपरेटर मिळणार आहे. तोपर्यंत गटप्रवर्तक आणि एमपीडब्लू कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. - श्रीकृष्णनाथ पांचाळमुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या