शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पाॅझिटिव्ह दीडशेच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत.

ठळक मुद्देविषाणूची चांगली घसरगुंडी : १४४ नवे रुग्ण, चार मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेले काही दिवस जिल्ह्याला जेरीस आणणाऱ्या कोरोना विषाणूची घसरगुंडी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आठवडाभरापासून नव्या रुग्णांची संख्या घटत असताना गुरुवारी नव्या पाॅझिटिव्हचा आकडा दीडशेच्याही खाली म्हणजे १४४ इतकाच नोंदविला गेला. तर दहाहून अधिक बळींचा सपाटाही थंडावला असून गुरुवारी चार बळी नोंदविले गेले. दरम्यान २८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मात्र नागरिकांनी अजूनही निष्काळजीपणे फिरणे धोक्याचे ठरू शकते.गुरुवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. बाभूळगाव तालुक्यातील ६१ वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरूषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील ५२ वर्षीय पुरूष आणि पुसद तालुक्यातील ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या १४४ जणांमध्ये ९२ पुरुष आणि ५२ महिला आहेत. यात आर्णी येथील ५, बाभूळगाव येथील ७, दारव्हा येथील १९, दिग्रस येथील २०, घाटंजी येथील ४, कळंब येथील २, महागाव येथील १, मारेगाव येथील ४, नेर येथील ६, पांढरकवडा १, पुसद येथील १७, राळेगाव १, उमरखेड ४, वणी येथील २२, यवतमाळ २९, झरी जामणी १ आणि इतर शहरातील १ रुग्ण आहे, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.  

पाच हजारांवर अहवाल निगेटिव्ह जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त आकडेवारीनुसार, गुरुवारी एकूण ५२९६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४४ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ५१५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२६१ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी १०६४ रुग्णालयात भरती आहेत. तर ११९७ गृह विलगीकरणात आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ४२६ झाली आहे. २४ तासात २८९ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ६७ हजार ४२० आहे. तर जिल्ह्यात एकूण १७४५ मृत्यूची नोंद आहे.

सहा लाखांवर चाचण्या, सव्वापाच लाख निगेटिव्हजिल्हयात आतापर्यत सहा लाख दोन हजार ४६३ चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख २९ हजार ७४२ निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.८६ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.७२ आहे. तर मृत्युदर २.४४ इतका आहे. मृत्यूदर अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे काळजी कायम आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या