शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडच्या मतखंडामध्ये कोरोनाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यात तब्बल ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्दे३१ अहवाल पॉझिटिव्ह : १११ नागरिक होते क्वारंटाईन, एका महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील मतखंड परिसरातील खरूस येथे तब्बल ३१ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे संपूर्ण मतखंड परिसरातच कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.खरूस येथील एका कोरोनाबाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान २८ जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या निकटच्या संपर्कातील १११ जणांना क्वारंटाईन केले होते. त्यांचे स्वॅब ३० जुलैला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सर्व अहवाल प्राप्त झाले. त्यात तब्बल ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. उर्वरित ८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मोठ्या प्रमाणात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मतखंडात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार १३६ नागरिकांचे स्वॅब तपासण्यात आले आहे. रविवारी तब्बल २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापाठोपाठ सोमवारीही ३१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मतखंडासह संपूर्ण तालुक्यात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने पाच जणांचे बळी गेले आहे. त्यात खरूस व नागापूर येथील प्रत्येकी एक महिला, ढाणकीचा एक पुरुष आणि उमरखेड शहरातील एक पुरुष व महिलेचा समावेश आहे. नव्याने पंचायत समितीचे कर्मचारी व पदाधिकारी पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह विविध शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची धास्ती निर्माण झाली.अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११३ वरतालुक्यात आतापर्यंत १५८ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ४२ जणांना उपचाराअंती सुटी देण्यात आली. आता तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ११३ झाली आहे. शहरासह ढाणकी, नागापूर, खरूस गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासकीय यंत्रणा उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. मात्र कोरोनाची साखळी तोडण्यात अद्याप यश आले नाही. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या