शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालुक्यात कोरोनाने १२ जणांचे बळी घेतले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे.

ठळक मुद्दे१२८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह : एकूण बाधितांचा आकडा ३६३, ग्रामीणमध्ये शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. बुधवारी तब्बल ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता तालुक्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२८ वर पोहोचली आहे.गेल्या महिन्यापासून शहर व तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३६३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात ग्रामीण भागातील ५९ तर शहरी भागातील ३०४ नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत २२५ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र तालुक्यात कोरोनाने १२ जणांचे बळी घेतले आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.तालुक्यातील हुडी येथील चार, निंबी पाच, मधुकरनगर सात, जांबबाजार पाच, धुंदी (तांडा) एक, चोंढी दोन, श्रीरामपूर पाच, गोविंदनगर तीन, वरूड चार, भंडारी एक, पार्डी नऊ, द्वारकानगरी दोन, आडगाव एक, हिवळणी दोन, बालाजी पार्क तीन, इसापूर एक आणि पिंपळगाव (ई) येथील एका नागरिकाला आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. चोंढी व श्रीरामपूर येथील प्रत्येकी एक महिला व इसापूर धरण येथील एका अशा तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ग्रामीण भागात सध्या २३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. ३३ जणांनी कोरोनावर मात केल्याचे गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी सांगितले.पुसद शहरात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ३०४ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. सध्या शहरात १०५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे. शहरातील नऊ जणांचे आतापर्यंत बळी गेले आहे. तर १९२ जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.दिवसेंदिवस शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या काही दिवसात दररोज २५ च्यावर अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू आहे. येथील आयुर्वेदिक रुग्णालय व आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण व संयशितांवर उपचार केले जात आहे. मात्र कोरोनाची साखळी अद्यापही तुटली नाही. त्यामुळे काळजी व्यक्त होत आहे.प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची गरजकोरोनाचे रुग्ण वाढत असताना अनेक नागरिक बिनधास्त वागत आहे. कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुकलवाड, बीडीओ शिवाजी गवई आदी कोरोनावर मात करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या