शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दोघांचा मृत्यू, ३१८ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST

मंगळवारी दगावलेले दोन्ही रुग्ण यवतमाळचे आहेत. त्यात शहरातील ७५ वर्षीय महिला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये २०८ पुरुष आणि ११० महिला आहेत. यात पुसद १०३, यवतमाळातील ६३ रुग्ण, दिग्रस ५६, वणी २३, बाभूळगाव २२, आर्णी ७, दारव्हा ७, कळंब २, महागाव १०, मारेगाव १, नेर ३, पांढरकवडा ८, उमरखेड ८, राळेगाव १ आणि ४ इतर रुग्ण आहेत.

ठळक मुद्देदोन्ही मृतक यवतमाळातील : ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा १९३०, बळी ४८४

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना एखाद्या हैवानासारखा सारा जिल्हा आपल्या जबड्यात घेत आहे. त्यातच रोज मृत्यूसंख्या वाढत असताना मंगळवारी आणखी दोघांचा जीव कोरोनाने घेतला. तर दिवसभरात तब्बल ३१८ जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा १९३० इतका प्रचंड मोठा झाला आहे.मंगळवारी दगावलेले दोन्ही रुग्ण यवतमाळचे आहेत. त्यात शहरातील ७५ वर्षीय महिला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये २०८ पुरुष आणि ११० महिला आहेत. यात पुसद १०३, यवतमाळातील ६३ रुग्ण, दिग्रस ५६, वणी २३, बाभूळगाव २२, आर्णी ७, दारव्हा ७, कळंब २, महागाव १०, मारेगाव १, नेर ३, पांढरकवडा ८, उमरखेड ८, राळेगाव १ आणि ४ इतर रुग्ण आहेत.मंगळवारी एकूण १४८२ नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. यापैकी ३१८ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ११६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १९३० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९ हजार ७४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात २५८ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १७ हजार ३२९ इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ४८४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख ७४ हजार ९९८ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १ लाख ७३ हजार ३२७ अहवाल प्राप्त झाले. तर १६७१ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ५३ हजार ३८४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आले आहे.

२५८ जणांना रुग्णालयातून सुटी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वाॅर्ड, विविध ठिकाणचे कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरेानाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातील तब्बल २५८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली. जिल्ह्यात एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या