शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी काँग्रेस-राकाँ अवसरवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:44 IST

राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : तिवारी, शेट्टींवर टीका, वंचित आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांकडील गांधीवाद संपला आहे. ते अवसरवादी झाले आहे. जेथे संधी मिळेल तेथे ते सेना, भाजपसोबत सत्ता स्थापन करत आहे. उदगिरमध्ये काँग्रेसने एमआयएमचा प्रस्ताव फेटाळून सत्तेसाठी भाजपाला सोबत घेतले आहे. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे खायचे दान अन् दाखवायचे दात वेगळे आहे, असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.बहुजन वंचित आघाडीची जाहीर सभा येथील समता मैदानावर बुधवारी सायंकाळी पार पडली. यावेळी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबईच्या विकास आराखड्यावर बोलतात. दुसरीकडे मात्र त्यांच्याच नगर जिल्ह्यातील २२ साखर कारखाने सरकारच्या धोरणामुळे बंद पडले आहेत, त्याबाबत बोलत नाही. मुंबईतील एका एकराचं आरक्षण हटविण्यासाठी किमान ५०० कोटीचा व्यवहार होतो. हा व्यवहारातील पैशाच्या हिशोब पाहून विरोधी पक्ष भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा कैवार दाखविणारे शेतकरी नेते केवळ डिंगा हाकतात. किशोर तिवारी, राजू शेट्टी यांच्या भूमिका योग्य नाही. सरकारने पाकिस्तानातून २० लाख मेट्रीक टन साखर स्वस्त दरात खरेदी केली. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला. हा प्रश्न कुणी उचलला नाही. टमाटे, कांदे या मालाला भाव नाही. हा माल टिकवता येईल, अशी कारखानदारी सरकार उभं करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बहुजन वंचित आघाडीलाच संधी द्यावी, देशातील उतरंडीची व्यवस्था संपविण्यासाठी सर्वांची भूमिका एक हवी. माझ्या वरती किंवा खाली कोणी नाही हा विचार घेवून प्रत्येकाने सत्तेपासून वंचित राहिलेल्यांसाठी झटले पाहिजे, असे आवाहन करत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीची उमेदवारी प्रवीण पवार यांना दिल्याचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रणधीर खोब्रागडे यांनी केले. त्यानंतर पश्चिम जिल्हाध्यक्ष उत्तम पांडे, प्रवक्ता राजा गणवीर, भास्कर पंडागळे, एमआयएमचे सैयद इरफान, धनराज उईके, चंदन तेलंग, पुष्पा इंगळे, बालमुकुंद भिरड, हिरासिंग राठोड, डॉ.दशरथ भांडे, रविकांत राठोड, माजी आमदार हरिदास भदे आदींनी मार्गदर्शन केले. आभार राजेंद्र तलवारे यांनी मानले.७० वर्षानंतर मनुवाद्यांचे डोके वरमनुवाद्यांविरोधातील पहिली लढाई नाही. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार-अलुतेदार शेतकºयांना सोबत घेवून मनुवादी व्यवस्था मोडीत काढली. रयतेचं राज्य उभं केलं. मात्र आता पुन्हा पेशवाईचं राज्य आलं आहे. लोकशाही ही प्रत्येकाच्या हातात आहे. ती टिकवण्यासाठी स्वत:च्या मताची किमत केली पाहिजे. आरएसएसचे मोहन भागवत संविधान नको मनुवादी व्यवस्था आणायची घोषणा करत आहे. याचे भान ठेवून धर्मवाद्यांना बळी न पडता आपल्या मताची किमत करावी, असेही आंबेडकर म्हणाले.नरेंद्र मोदींचे सरकार महाचोरदेशाच्या पंतप्रधानांनी गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रतिसादाला साद देत २२ हजार कोटींची सबसिडी नागरिकांनी सोडली. मात्र ही सबसिडी गोरगरिबांना दिली नाही. हे सरकार खोटारड आहे, त्यांनी १५ लाख देण्याची, काळा पैसा परत आणण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात तसं झालं नाही. मात्र महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये एक मत पाच हजाराला विकत घेतले. ते पैसे सत्ताधाºयांकडे आले कोठून, मागचं सरकार चोर होतं. मात्र हेही सरकार महाचोर आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर