शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

काँग्रेसच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:59 PM

केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : जिल्हा काँग्रेस कमिटीचे ‘व्हीजन-२०१९’ शिबिर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते. सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच न्याय देऊ शकते, कार्यकर्त्यांनी भाजपाची जुलमी राजवट उलथविण्यासाठी कामाला लागला, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘व्हीजन-२०१९’ अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील आर्णी मार्गावरील वादाफळे पॅलेसमध्ये शुक्रवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार आणि बेरोजगार युवकांच्या समस्यात भर घातली. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. आज बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कधी नव्हे इतक्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यवतमाळात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचे मृत्यू तांडव घडले. शासनाने चौकशीचा देखावा केला. मात्र अहवालात कुणाचीच चूक नसल्याचे सांगितले. यावरून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.काँग्रेसच सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते, यासाठी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पीक विमा, शेतमालाचे आधारभूत मूल्य, रोजगार निर्मिती यावर फोकस केला जाणार आहे. अडचणीत असलेल्या जनतेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.शिबिराच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुनगेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, एनएसयुआयचे राज्याध्यक्ष आमीर शेख, आमदार हरिभाऊ राठोड, प्रकाश साबळे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, विजय खडसे, विजयाताई धोटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माधुरी अराठे, संध्याताई सव्वालाखे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष सुनील भेले, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड अजय किन्हकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस