Join us  

रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...

SRH vs RR IPL 2024 Qualifier-2 update: एसआरएचला आज राजस्थान रॉयल्स दोन हात करायचे आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळविला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 7:34 AM

Open in App

आयपीएलचे अवघे दोन सामने राहिले आहेत. आज जो संघ क्वालिफाय होईल तो फायनलमध्ये खेळणार आहे. रविवारी आयपीएलची फायनल मॅच आहे. क्वालिफायर १ जिंकून कोलकाता नाईट रायडर्सची टीम आधीच फायनलसाठी डेरेदाखल झाली आहे. अशातच या संघाकडून हरलेली सनरायझर्स हैदराबाद फायनलला पोहोचणार की नाही यापासून ते फायनलला पोहोचली तर जिंकणार की नाही याचे अंदाज बांधले जात आहेत. 

एसआरएचला आज राजस्थान रॉयलशी दोन हात करायचे आहेत. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळविला जाणार आहे. याच मैदानावर फायनलही होणार आहे. आता पुन्हा एकदा पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाला आयपीएलचा चषक जिंकण्याची संधी आहे. क्वालिफायर १ हरून फायनल जिंकण्याची किमया आतापर्यंत दोनदाच साध्य झाली आहे. 

हैदराबाद संघाने यावेळी विजेतेपद पटकावल्यास इतिहास रचला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा संघ ठरणार आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात फक्त मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-1 गमावूनही जेतेपद पटकावले आहे. एमआयने हे एकदा नाही तर दोनदा साध्य करून दाखविले आहे. 

2013 आणि 2017 मध्ये मुंबई संघ क्वालिफायर-1 मध्ये पराभूत झाल्यानंतर क्वालिफायर-2 जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता. दोन्ही वेळेला एमआयने क्वालिफायर १ मध्ये ज्या संघाकडून पराभव पत्करलेला त्या संघाला फायनलमध्ये धुळ चारली होती. 

पावसाची बाधा... कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर १ जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर २ सामना होणार आहेत. हे दोन्ही सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहेत. २४ मे रोजी क्वालिफायर २ चा सामना होईल आणि त्यानंतर २६ मे रोजी फायनल होईल. पण, या दोन्ही सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. पावसामुळे दोन्ही सामने रद्द करावे लागल्यास, जेतेपदाची ट्रॉफी कोण जिंकेल, हा प्रश्न आता फॅन्सना सतावत आहे. 

SRH vs RR यांच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि शुक्रवारी सामना होऊ शकला नाही, तर शनिवारचा राखीव दिवस या सामन्यासाठी मिळतोय. चला समजूया की राखीव दिवसातही सामना झाला नाही, तर SRH फायनलसाठी पात्र ठरणार आहे. कारण, गुणतालिकेत त्यांनी दुसरे स्थान पटकावले होते आणि ते RR च्या पुढे होते. तसंच जर फायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आला, तर राखीव दिवस आहे. राखीव दिवशीही मॅच न झाल्यास KKR ला विजयी घोषित केले जाईल.  

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद