शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हायरसने रंगपंचमी केली बेरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST

कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाºया, विविध प्रकारचे मास्क अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या. खास करून मास्क चिनमध्ये तयार केले जातात.

ठळक मुद्देचीनमधून नवा माल आलाच नाही : चायना माल उचलण्यास स्थानिक ग्राहकांचा नकार, व्यापारी अडचणीत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने आर्थिक उलाढालीवरही परिणाम होऊ लागला आहे. रंगपंचमीच्या उत्सवावरही फरक पडला आहे. भारतीय वापाऱ्यांनी माल खरेदीसाठी केलेले कोट्यवधीचे बुकींग अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे ग्राहकही चिनमधून आलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी नकार देत आहेत.कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून पिचकाºया, विविध प्रकारचे मास्क अशा वस्तू चिनमधून आयात होत होत्या. खास करून मास्क चिनमध्ये तयार केले जातात. या मास्कला देशभरात रंगपंचमी उत्सवात अधिक मागणी असते. आता कोरोनामुळे मास्क खरेदी करण्यासाठी ग्राहक आखडता हात घेत आहे.चिनमधून येणाºया विविधरंगी पिचकाºया, गॉगल्स, टोप्या आणि विविध रंगाचे केसांचे मुखवटे बाजारात येतात. यंदाही भारतीय व्यापाऱ्यांनी चिनकडे या वस्तूंच्या मागणीसाठी बुकींग नोंदविले होते. जानेवारीमध्येच अ‍ॅडव्हान्स देण्यात आला. जानेवारीत १० टक्के माल आला. नंतर कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. तेव्हापासून साहित्य येणेच थांबले आहे. यामुळे होळीच्या तोंडावर व्यापारी अडचणीत आले आहेत. दुसरीकडे, ग्राहकही अमूक माल चायनाचा आहे काय, असा विचारतो. तो चायनाचा नसेल तरच खरेदी करतो.या परिस्थितीने दुकानदार अडचणीत आले आहे. यावर्षी बाजारावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. बुकींगनंतरही माल आला नाही. यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. भारतीय वस्तूंची मागणी वाढली असल्याचे यवतमाळ येथील सिया कलेक्शनच्या संचालकांनी सांगितले.गुलाल, रंगाची मोठी आयातपक्के केमिकल रंग चिन पुरविते. अशा रंगाला मागणी आहे. मात्र असे रंग बाजारात कमी प्रमाणात मागितले जात आहेत. त्याची जागा गुलाल रंगाने घेतली आहे. मोठ्या प्रमाणात गुलालाची मागणी बाजारात वाढली.भारतीय मालाचा उठावकोरोनाच्या दहशतीने चिनी माल आला नाही. बाजारातही अशा मालाला उठाव नाही. अशा स्थितीत भारतीय रंग पिचकाºया, रंगपंचमीचे साहित्य मोठ्या प्रमाणात मागितले जात आहे.जिल्हाभरात परिणामरंगपंचमी आठवड्यावर आली आहे. ग्राहकांनी होलसेल दुकानदारांकडे गर्दी केली आहे. काही विक्रेते चिनी मालाची मागणी करीत आहेत. तर काहींनी भारतीय वस्तूंचीच मागणी करण्यास सुरूवात केली. एकूणच बाजाराचा अंदाज न आल्याने भारतीय वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना