दुचाकी-पिकअपवर आदळली, दोन ठार 1 गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 16:12 IST2020-12-28T16:11:55+5:302020-12-28T16:12:39+5:30
जखमीला पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

दुचाकी-पिकअपवर आदळली, दोन ठार 1 गंभीर जखमी
वणी (यवतमाळ) : समोर जात असलेल्या पिकअपवर मागून येणारी दुचाकी धडकली. या भीषण अपघातात दोनजण ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पाटणबोरीलगतच्या पिंपळखुटी चेकपोस्ट नाक्याजवळ घडली. जखमीला पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
अपघातातील मृतांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात येत असून जखमी व मृतांची ओळख पटविली जात आहे.