शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थंड पाण्याचा व्यापार प्रशासकीय नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:17 IST

यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईचा फायदा उठवित सुरू झालेल्या शुद्ध (?) थंड पाण्याचा व्यापार जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. या पाणीपुरवठादारांवर नेमकी कुणी कारवाई करावी, हेच अद्याप स्पष्ट नाही.

ठळक मुद्देशुद्धतेवर प्रश्नचिन्ह : वर्षभरात एकही तपासणी नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरातील भीषण पाणीटंचाईचा फायदा उठवित सुरू झालेल्या शुद्ध (?) थंड पाण्याचा व्यापार जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे. या पाणीपुरवठादारांवर नेमकी कुणी कारवाई करावी, हेच अद्याप स्पष्ट नाही.म्हणायला अशा प्लँट व पुरवठादारांवर कारवाईचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन विभाग, नगरपरिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. परंतु यापैकी गेल्या वर्षभरात कुणीही कारवाई केल्याची नोंद नाही. एवढेच काय, यवतमाळ शहरात नेमके किती प्लँट आहेत, दरदिवशी जमिनीतून पाण्याचा किती उपसा होतो, किती रुपयाला कॅन विकली जाते, त्यासाठी किती डिपॉझिट घेतले जाते, त्याची वाहतूक व पुरवठादार कोण, याबाबतची सविस्तर माहितीसुद्धा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. गेल्या वर्षभरात प्रशासनातील कुणीही या प्लँटवर भेट दिली नाही की पाण्याचे नमुने घेतले नाही. उलट आमच्याकडे प्लँटसंबंधी कुणी तक्रारीच केल्या नसल्याचे सांगून प्रशासनाने चक्क हात वर केले आहे.शुद्ध पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ थंड पाणी नागरिकांना दिले जात आहे. त्यामुळे यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याच नाईलाजाचा फायदा घेऊन पाणीपुरवठादार व प्लँटकडून आर्थिक लूट सुरू आहे. कुणी ३० रुपयाला तर कुणी ४० रुपयाला पाण्याची ही कॅन (कुलकेज) विकतो आहे. त्यासाठी चक्क शासकीय यंत्रणेप्रमाणे ओळखपत्र मागितले जात आहे. शिवाय कॅनच्या किमतीएवढे डिपॉझिट घेतले जात आहे. सोबत कॅन लगेच खाली करून आणून द्या, ही अट आहेच.यवतमाळ शहरात थंड पाण्याच्या या व्यापारात वर्षभर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. लग्न समारंभ व कार्यक्रमांमध्ये तर सर्रास अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. एकीकडे प्रशासनाने सामान्य नागरिकाला बोअरवेल खोदण्यासाठी बंदी घातली आहे. वैयक्तिक पिण्याच्या पाण्यासाठी त्याला बोअर खोदता येत नाही, तर दुसरीकडे थंडगार पाण्याचा व्यापार करणारी ही मंडळी दररोज जमिनीतून हजारो लिटर पाण्याचा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून उपसा करीत आहे. या पाण्याचा व्यावसायिक कामासाठी वापर होत असला तरी पाण्याचा तो दर त्यांना अनेक ठिकाणी लावला जात नाही. या व्यवहाराचे खुद्द प्रशासनाकडेच कोणतेच रेकॉर्ड नसल्याने या पाणीपुरवठादारांनी प्राप्तीकर, जीएसटी भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.यवतमाळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा राजरोसपणे थंड पाणीपुरवठ्याचा व्यापार सुरू असताना कारवाईचे अधिकार असलेली प्रशासनातील संबंधित यंत्रणा मुग गिळून कशी याचे कोडे उलगडलेले नाही. पाण्याच्या या व्यापारातील वार्षिक उलाढालीचे आकडे पाहता शासकीय यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यातच आपला ‘फायदा’ करून घेत आहे. वर्षभरात अशा प्लँटवर भेटी देण्यास संबंधित शासकीय यंत्रणेला सवड मिळू नये, यातच जिल्हा प्रशासनाचे खरे अपयश लपले आहे.नागरिकांचा नाईलाज, आरोग्य धोक्यात, आर्थिक लूटनागरिकांचे पाण्यासाठी यवतमाळात प्रचंड हाल सुरू आहेत. त्यामुळे अशा थंडगार पाण्याचाच त्यांना आधार आहे. त्यातूनच या थंड पाणीपुरवठादारांना अप्रत्यक्ष सहानुभूती मिळत आहे. त्याचा फायदा उठवित या मंडळींनी जनतेची अक्षरश: लूट चालविली आहे. यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी या थंड पाण्याचे अनधिकृत प्लँट व पुरवठादार असून त्याद्वारे शहराच्या चौफेर दररोज हजारो कॅनद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पूर्वी समारंभ-कार्यक्रमासाठीच बोलाविल्या जाणाऱ्या या कॅन आता पाणीटंचाईमुळे घरोघरीसुद्धा बोलवाव्या लागत आहे. त्यातूनच पाण्याचा हा व्यापार चौपटीने वाढला आहे. अर्थात त्याची ‘उलाढाल’ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याच्या ‘लाभाचे पाट’ कारवाईचे अधिकार असलेल्या संबंधित शासकीय यंत्रणेच्या कार्यालयांपर्यंत वाहात असल्याचे बोलले जात आहे. थंड पाण्याच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणी