राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटून क्लिनर ठार, चालक जखमी
By विलास गावंडे | Updated: July 7, 2023 16:45 IST2023-07-07T16:44:27+5:302023-07-07T16:45:44+5:30
वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

राष्ट्रीय महामार्गावर ट्रक उलटून क्लिनर ठार, चालक जखमी
वडकी (यवतमाळ) : राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वरील देवधरी घाटात अनियंत्रित ट्रक उलटला. या घटनेत ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला, तर चालक गंभीर जखमी आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली.
जाफर अली (२९, रा. हैदराबाद) असे या अपघातातील मृताचे नाव आहे. जहीर खान (३२, रा. हैदराबाद) असे जखमी चालकाचे नाव आहे. बंगळुरूकडून नागपूरकडे जात असलेल्या के.ए.१५/ए.एफ.७८९९ या क्रमांकाच्या ट्रकला हा अपघात झाला. वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवधरी घाटात उताराच्या भागात हा ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. यात क्लिनरचा मृत्यू झाला.