इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 18:33 IST2025-08-10T18:33:11+5:302025-08-10T18:33:19+5:30
पिडित मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.

इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
यवतमाळ: जिल्हा परिषद शाळेत एकाच वर्गात असलेल्या इयत्ता तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गातील मुलाने बाथरूम मध्ये नेऊन अत्याचार केला. हे कृत्य करण्यात एका मुलीनेही त्याला मदत केली. ही घटना १ ऑगस्ट राेजी दुपारी बाभुळगाव तालुक्यातील एका गावात घडली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी या प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त मुलगा व मुलगी या दाेघांच्या विराेधात पाॅक्साे अंतर्गत गुन्हा दाखल केला.
एकाच गावातील एकाच वर्गात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील नऊ वर्षांच्या मुलाने व मुलीने केलेले कृत्य ऐकून सर्वांनाच हादरा बसला. पिडित मुलीला लघवीच्या जागेवर जखम झाल्याने तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने बाभुळगाव पाेलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या संवेदनशिल प्रकरणाचा तपास करत पाेलिसांनी पिडित मुलीच्या जबाबावरून कलम (२),३(५) भारतीय न्यायसंहितेनूसार सहकलम ४(२),६ पाॅक्साे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाेन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांतील मुलाला यवतमाळ येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. तर मुलीला अमरावती येथील बाल निरीक्षण गृहात ठेवले आहे. पिडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते, अशी माहिती बाभुळगाव ठाणेदार लहुजी तावरे यांनी ‘लाेकमत’ ला दिली.