शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’च्या ५० जागांवर गंडांतर

By admin | Updated: April 18, 2015 02:10 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या वाढीव ५० जागांवर गंडांतर येण्याची शक्यता

सुरेंद्र राऊत यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस प्रथम वर्षाच्या वाढीव ५० जागांवर गंडांतर येण्याची शक्यता असून भारतीय आयुर्विज्ञान परिषद (एमसीआय)च्या निर्देशाप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात महाविद्यालयाला अपयशी ठरले. आता एमसीआयने या जागा कायम ठेवण्यासाठी शेवटची संधी दिली असून उणिवा पूर्ण करण्यासाठीच धडपड सुरू आहे. एमसीआयच्या पथकाने सप्टेंबर महिन्यात ‘मेडिकल’ची तपासणी केली होती. त्यात १४.९७ टक्के शिक्षकांची पदे रिक्त आढळून आली. प्रत्यक्षात रजेवर असलेल्या शिक्षकांच्या जागाही पथकाने रिक्त दाखविल्या. तर १५ टक्के निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त दाखविण्यात आली. शल्यचिकित्सा विभागात १२० खाटांची आवश्यकता असताना केवळ ९६ खाटाच आढळून आल्या. बाह्यरुग्ण तपासणीचा आकडाही कमी दाखविला. दर दिवशी किमान १००० रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विकृतीशास्त्र विभागामध्ये हिस्ट्रो पॅथॉलॉजी रिपोर्ट होत नाही, अपघात कक्षात स्त्रीरोग तपासणीची व्यवस्था नाही, आॅपरेशन थेटरमधील प्री आॅपरेटिव्ह खाटांची व्यवस्था नाही. अतिदक्षता कक्षामध्ये आणखी पाच बेड हवे आहेत. फॉर्मोकोलॉजी व्हिजीलन्स कमिटी येथे अस्तित्वात नाही. या कमिटीने घेतलेल्या बैठकांचे मिनिटस एमसीआय चमूपुढे सादर करण्यात आले नाही. १६० आसन क्षमतेचे दोनच अध्यापन कक्ष असल्याचीही त्रुटी काढण्यात आली आहे. ब्लड कम्पोनंट युनीट नसल्याची सर्वात मोठी त्रुटी काढण्यात आली आहे. यामुळे अनेक विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली नाही. या त्रुट्यांची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन धडपड करत आहे. अन्यथा ५० जागा कमी होण्याची नामुष्की ओढविणार आहे.