शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा येथे चिनी मांजाची धडाक्यात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

या मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या दोन दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पतंगबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची क्रेझ दिसून येत आहे. गतवर्षी या मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : मकरसंक्रांतीच्या पर्वावर पतंगबाजीला उधाण, पाखरांचे जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : बंदी असतानाही पांढरकवडा शहर व तालुक्यातील बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू आहे. परिणामी या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या मांजामुळे नागरिकांसह पक्षांचाही जीव धोक्यात आला असून, विक्रेत्यांवर आतापर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या दोन दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपल्याने पांढरकवडा शहरासह तालुक्यात पतंगबाजीला उधाण आले आहे. त्यामुळे बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची क्रेझ दिसून येत आहे. गतवर्षी या मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे. परंतु हा मांजा नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने बाजारपेठेत नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. प्लास्टिकला बंदी असतानाही प्लास्टिकपासून निर्मित पतंगांची धडाक्यात विक्री सुरू आहे. नायलॉन मांजासह प्लास्टिकच्या पतंग झाडात किंवा वीज वाहिनीत अडकल्याने त्या पक्ष्यांसाठी घातक ठरत आहेत.

टॅग्स :Marketबाजार