शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

''मुख्यमंत्री भाऊ, डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 20:41 IST

परतीच्या अवकाळी पावसाने शेतातील नेस्तनाबूत झालेले पीक पाहून चिंताग्रस्त तरुण मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला.

यवतमाळ: परतीच्या अवकाळी पावसाने शेतातील नेस्तनाबूत झालेले पीक पाहून चिंताग्रस्त तरुण मुलाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. एका मुलीच्या लग्नाकरिता उसनवार घेतलेले कर्ज कसे फेडायचे ?, दुस-या विवाहयोग्य मुलीचे लग्न कसे करायचे ?, शेतीकरिता घेतलेले कर्ज कसे फेडायचे ?, संसाराचा पुढील गाडा कसा पेलायचा? अशा नानाविध प्रश्नाने मनात काहुर माजलेले आहे. अशा कठीण प्रसंगी मुख्यमंत्री भाऊ, माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या, अशी आर्त साद मागील वर्षी मुंबई येथे जाऊन देवेंद्र फडणवीसांना राखी बांधणा-या एका मुस्लिम बहिणीने घातली आहे. अकोला बाजार येथील शेतकरी विधवा महिला फरजानाबी हुसेनखाॅ पठाण ( 62) यांना आठ मुली असून, एक तरुण मुलगा होता. त्यापैकी सात मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी सध्या विवाहयोग्य आहे. मागील उन्हाळ्यात एका मुलीचे लग्न झाले. त्या लग्नाकरिता घेतलेले खासगी कर्ज, शेताकरिता घेतलेले पीककर्ज आता कशाने फेडायचे अशी चिंता त्यांचा मुलगा अरबाजखाॅ हुसेनखाॅ पठाण याला भेडसावत होती. तो 31 ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी शेतात गेला, एवढ्या कष्टाने उभे केलेले पीक परतीच्या अवकाळी पावसाने हातातून गेलेले पाहून त्याला ह्रदयाघात झाला आणि त्यात त्याचे निधन झाले. यंदा त्याचेही लग्न करायचे ठरले होते. एकुलता एक होतकरू मुलगा मरण पावल्यामुळे फरजानाबीचे कुटुंब पोरके झाले आहे. अवकाळी पावसाने शेतातील पीकही गेले, तरुण होतकरू मुलगाही जग सोडून गेला, त्यामुळे पुढील आयुष्य जगायचे कसे, मुलीचे लग्न कसे करायचे, कर्ज कसे फेडायचे असे नानाविध प्रश्न भेडसावत असताना फरजानाबींना अशा संकटकाळी भाऊ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आठवण आली. माझ्या डबघाईस आलेल्या कुटुंबाला सावरण्याचं बळ द्या व माझ्या कुटुंबाचे रक्षण करा म्हणत फरजानाबींनी देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे आर्त साद घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यासंबंधी कर्जमाफीसारखे अनेक निर्णय घेतले. त्या निर्णयाची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता जिल्ह्यातील दहा शेतकरी महिलांनी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती. त्यामध्ये अकोला बाजार येथील रहिवासी फरजानाबी यांचा ही समावेश होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस