शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेच्या शाळा प्रभारींवर

By admin | Updated: August 1, 2014 00:29 IST

येथील नगरपरिषदेच्या ११ शाळांपैकी एकाही शाळेत अधिकृत मुख्याध्यापक नाही़ सर्वच्या सर्व शाळा प्रभारी मुख्याध्यापकांच्या भरवशावर सुरू आहे़ मात्र नगरपरिषदेची शाळा समिती याकडे लक्ष द्यायला तयार नाही़

वणी : येथील नगरपरिषदेच्या ११ शाळांपैकी एकाही शाळेत अधिकृत मुख्याध्यापक नाही़ सर्वच्या सर्व शाळा प्रभारी मुख्याध्यापकांच्या भरवशावर सुरू आहे़ मात्र नगरपरिषदेची शाळा समिती याकडे लक्ष द्यायला तयार नाही़ शिक्षणासारख्या गंभीर बाबीवरसुध्दा नगरपरिषद उदासीन असल्याने नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़शहरात नगरपरिषदेच्या ११ प्राथमिक शाळा सुरू आहेत़ यात एक हिंदी व एका ऊर्दू शाळेचाही समावेश आहे़ शहरात केवळ तीनच खासगी प्राथमिक शाळा असल्याने प्राथमिक शिक्षणाचा संपूर्ण भार नगरपरिषदेच्या शाळांवर आहे़ सर्वच शाळेत पुरेसे विद्यार्र्थीही आहे़ विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्यादेखील आहे़ मात्र अलीकडे इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढल्याने या मराठी शाळांकडील विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने मराठी शाळा तुटतील की काय, अशी भिती व्यक्त होत आहे़ त्यासाठी मराठी शाळांना स्पर्धेत उतरण्याची गरज आहे़ खासगी इंग्रजी शाळांसोबत स्पर्धा करण्यासाठी नगरपरिषद शाळांना सक्षम मुख्याध्यापकाची आवश्यकता आहे़ परंतु नगरपरिषदेच्या एकाही शाळेत मुख्याध्यापक नाहीत़ अकराही शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक कारभार सांभाळत आहे़ नगरपरिषदेच्या इतिहासात अशी वेळ येण्याची ही पहिलीच वेळ आहे़ कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांना बढती देऊन मुख्याध्यापकांची पदे भरण्याचा नियम आहे़ परंतु त्यासाठी आरक्षणानुसार बढती द्यावी लागते़ नियुक्ती व बढतीची बिंदू नामावली आयुक्त (मागासवर्गीय) अमरावती यांच्याकडून प्रमाणीत करून घ्यावी लागते़ मात्र नगरपरिषदेने अजूनही बिंदू नामावली मंजूर करून घेतली नाही़ त्यामुळे मुख्याध्यापकांच्या पदोन्नती रखडल्या आहे़ येथील नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने जबाबदारीने काम करायला कोणी तयार नाही़ शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी व शिक्षण समितीसुध्दा या बाबीविषयी गंभीर दिसत नाही़ शिक्षण समितीची वर्षभरात एकही सभासुध्दा झाली नसल्याची माहिती आहे. शिक्षणासारख्या बाबींवर विचार करायची तसदी शिक्षण समितीने न घेतल्याने समितीचे कार्य तरी कोणते, हे समजायला मार्गच उरला नाही़ (स्थानिक प्रतिनिधी)