शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शंकर बडे विधान परिषदेचे उमेदवार

By admin | Updated: October 25, 2016 02:34 IST

जिल्ह्यातील विधान परिषद आणि आठ नगरपरिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय

मुंबईत निर्णय : काँग्रेस स्वबळावर लढणार यवतमाळ : जिल्ह्यातील विधान परिषद आणि आठ नगरपरिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यात यवतमाळची विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची उमेदवारी पांढरकवडाचे नगराध्यक्ष शंकर बडे यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला. शिवाय जिल्ह्यातील आठपैकी सात नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. दिग्रसचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, लवकरच तेथील नावाची घोषणा केली जाणार आहे. शंकर बडे यांच्या उमेदवारीने आघाडी होणार का, उमेदवार कोण, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडे सहा नावे आली होती. त्या सर्व नावांवर संसदीय समितीसमोर चर्चा झाली. अखेर सर्व पैलूंनी विचार करून शंकर बडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बडे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांचे खंदे समर्थक मानले जातात. बडे यांचे नाव जाहीर झाल्याने काँग्रेसच्या यादीतील अन्य उमेदवारांवर इतर पक्षांकडून गळ टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भाजपा, शिवसेना या पक्षांची ‘सक्षम’ उमेदवारांच्या शोधात भटकंती सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी) राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपातील घोळ कायम ४विधान परिषद व नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी, भाजपा, सेनेतील गुंतागुंत मात्र कायम आहे. भाजपा विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत आहे. तर या बालेकिल्ल्यातून पर्याय म्हणून नागपूरच्या माजी मंत्र्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. शिवसेनेने मुंबईतील एका उद्योगपतीची चाचपणी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याची वेळ आलेल्या राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी ‘मोठा की लहाना’ अशी रस्सीखेच घरातच पाहायला मिळत आहे. सेनेने मात्र नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करून नगरपरिषदेत आघाडी घेतली. यवतमाळ विधान परिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मुंबईच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसने शंकर बडे यांना तर यवतमाळ नगराध्यक्षपदाची उमेदवारी संध्याताई सव्वालाखे यांना देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. - वामनराव कासावार, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ