साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करा

By Admin | Updated: May 13, 2016 02:41 IST2016-05-13T02:41:46+5:302016-05-13T02:41:46+5:30

तालुक्यातील साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसील व वनविभागाकडे गुरूवार, १२ मे रोजी सादर केले आहे.

Cancel the licenses of Mohfula in Sugar | साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करा

साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करा

ग्रामस्थांचे निवेदन : उपसरपंचांकडून गावठी दारू व्यवसायाला बळ
दिग्रस : तालुक्यातील साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसील व वनविभागाकडे गुरूवार, १२ मे रोजी सादर केले आहे.
साखरा येथील मनोज रामप्रसाद जयस्वाल यांना मोहफुलाचा परवाना मिळालेला आहे. परंतु गावामध्ये गावकरी दारूबंदी साठी पुढाकार घेत आहेत. सध्या मनोज जयस्वाल हा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी असल्यामुळे तो गावात काही लोकांना सांगून दारू गाळायला लावत आहे. मी गावाचा उपसरपंच असल्यामुळे पोलीस ठाणे मी पाहतो, तुम्ही फक्त दारू पाडा आणि माझ्या दुकानातून मोहफुल विकत घ्या, असे लोकांना म्हणत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या आगोदर चार ते पाच वेळा त्याच्यावर कार्यवाही झाली होती, त्यामुळे त्याचे दुकान पण बंद झाले होते. परंतु ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि तो निवडून आला आणि उपसरपंच झाला. तेव्हापासून त्याने पुन्हा दुकान चालू केले असल्याचे निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे गावात दहशत पसरविणे, गावात भानगडी उपस्थित करणे असे कृत्य सुरु केले असल्याचा आरोप करीत परवाना रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर हिम्मत राठोड, रतन पवार, प्रल्हाद राठोड, बळीराम राठोड, रमेश राठोड, रोहिदास राठोड, रघुनाथ राठोड, उमेश जाधव, अरुण राठोड, कैलाश माळवे, हरीचंद राठोड, संदीप जयस्वाल, रतन जयस्वाल, मधुकर चव्हाण, संतोष आडे, युवराज आडे, दिलीप आडे, मैरुसिंग राठोड, निलेश राठोड, उदयसिंग राठोड, विनोद आडे, जयदेव चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Cancel the licenses of Mohfula in Sugar