शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुकानासह घर भस्मसात

By admin | Updated: October 7, 2014 23:40 IST

एका किराणा दुकानासह घराला आग लागली. या आगीत दिवाळीसाठी भरुन ठेवलेला किराणा आणि घर भस्मसात झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न

करंजखेडची घटना : घराचे पाच लाखांचे नुकसान महागाव : एका किराणा दुकानासह घराला आग लागली. या आगीत दिवाळीसाठी भरुन ठेवलेला किराणा आणि घर भस्मसात झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. महागाव तालुक्यातील करंजखेड येथे संतोष देवरकर यांचे किराणा दुकान आहे. या दुकानालाच लागून त्यांचे घर आहे. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास किराणा दुकानाला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने संपूर्ण किराणा दुकान कवेत घेतले. तसेच लगतच्या घरालाही या आगीची झळ पोहोचली. काही क्षणातच घरही आगीच्या भक्षस्थानी सापडले. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. उमरखेड नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत परिसरातील घरे रिकामे करणे सुरू केले होते. दिवाळीचा सण असल्याने संतोष देवकर यांनी विक्रीसाठी दुकानात दोन लाख रुपयांचा किराणा माल भरला होता. किराणा माल भस्मसात झाला आहे. तसेच त्यांच्या घराचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी नायब तहसीलदार एस.एम. पांडे, पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, सरपंच भरोस चव्हाण यांंनी धाव घेतली. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अवघ्या तासाभरात आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमुळे नुकसान झालेल्या संतोषला मदत देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)