महामंडळाची बस उलटली, 25 प्रवासी जखमी अन् 3 गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:35 IST2018-08-07T15:57:53+5:302018-08-07T16:35:45+5:30
एसटी महामंडळाची बस (क्रमांक एम. एच. ४० वाय ५५६४) वणी मारेगाव दरम्यान गोपाळा गावालगत उलटली. बसपुढे अचानक रोही (जंगली प्राणी) आडवा आल्याने

महामंडळाची बस उलटली, 25 प्रवासी जखमी अन् 3 गंभीर
वणी (यवतमाळ): पुसद येथून राजूराकडे निघालेल्या बसला अपघात झाली आहे. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. एसटी महामंडळाची बस (क्रमांक एम. एच. 40 वाय 5564) वणी मारेगाव दरम्यान गोपाळा गावालगत उलटली. बसपुढे अचानक रोही (जंगली प्राणी) आडवा आल्याने हा अपघात घडल्याचे चालकाने सांगितले. मंगळवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
वणी-मोरेगाव जवळी गावालगत रोही आडवा आल्याने या बसला अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस राजूराकडे निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रशासनाही हजर झाले आहे. याबाबत तत्काळ संबंधित डेपोला माहिती देण्यात आली असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.