अट्टल घरफोड्या पोक्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:21 IST2018-06-16T22:21:26+5:302018-06-16T22:21:26+5:30

शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

Both of them were arrested with an unidentified burglary pocket | अट्टल घरफोड्या पोक्यासह दोघांना अटक

अट्टल घरफोड्या पोक्यासह दोघांना अटक

ठळक मुद्देपाच गुन्हे उघड : टोळीविरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील अवधुतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने घरफोड्या होत आहेत. टोळी विरोधी पथकाने दोन अट्टल घरफोड्यांना अटक केली असून त्यांनी या परिसरातील पाच ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सराफा लाईनमध्ये चोरीचे सोने विकण्याच्या बेतात असलेल्या राजू उर्फ पोक्या दिवाकर भेंडे (४८) रा.गुरुनानकनगर आणि त्याचा सहकारी संजय नामदेव ढगे (४०) रा.आदिवासी सोसायटी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, रोख ११ हजार, संजय ढगे याच्याजवळून रोख चार हजार, चांदीचे पाच सिक्के, चांदीची मूर्ती, चांदीच्या दोन वाट्या असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, सहायक फौजदार ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशीष गुल्हाने, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, आकाश सहारे, राजकुमार कांबळे, यशवंत जाधव, गौरव ठाकरे, राहुल जुकुंटवार, प्रवीण मेगरे यांनी केली.

Web Title: Both of them were arrested with an unidentified burglary pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.