८०० रुपयांसाठी तरुणाचा खून

By Admin | Updated: March 2, 2015 02:01 IST2015-03-02T02:01:22+5:302015-03-02T02:01:22+5:30

वाहन भाड्याच्या वादात केवळ ८०० रुपयांसाठी एका तरुणाचा तलवारीने १४ वार करून भीषण खून केला. ही घटना शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथे घडली.

The blood of the youth for 800 rupees | ८०० रुपयांसाठी तरुणाचा खून

८०० रुपयांसाठी तरुणाचा खून

दिग्रस : वाहन भाड्याच्या वादात केवळ ८०० रुपयांसाठी एका तरुणाचा तलवारीने १४ वार करून भीषण खून केला. ही घटना शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास येथे घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली.
महंमद हसन पप्पूवाले (२६) रा. आर्णी नाका दिग्रस असे मृताचे नाव आहे. त्याच्याकडे वाहन भाड्याचे ८०० रुपये होते. यावरुनच वाद होऊन काही जणांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी महंंमद पप्पूवाले याची आई तसलीमा पप्पूवाले हिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख फिरोज शेख मोबीन, शेख मतीन शेख मोबीन, मुन्ना नागपूरवाला, शेख बबलू शेख मोबीन, शेख इम्रान शेख मोबीन, शेख शोएब शेख फिरोज, शे.मोहनीस शे. मोबीन, शाहीन शे.फिरोज, सलीमा शे.मोबीन, यासीन आदींवर गुन्हा दाखल केला. यापैकी शे.मोहसीन याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The blood of the youth for 800 rupees