शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची सत्ता, तरीही कामांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

नगरपरिषदेची घडी मागील पाच वर्षापासून विस्कटलेली आहे. पालिकेतील अर्थकारणात सर्वात महत्वाचा घटक येथील घनकचरा कंत्राट आहेत. यातूनच मोठी उलाढाल होते. गेल्या अनेक वर्षापासून येथील अर्थकारण याच कंत्राटाभोवती फिरत आहे. अप्रत्यक्षरीत्या यात अनेकांचे हितसंबध अडकलेले आहेत. त्यात बाजार वसुली, घनकचरा गोळा करणे, रस्ते सफाई यासह इतरही कंत्राटाचा समावेश आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषद, भाजप नगरसेवकांची आज चिंतन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेत भाजपचे बहुमत व सत्ता असूनही येथील कामकाजाचा बोजवारा उडाला आहे. कोणावर कोणाचे नियंत्रण नाही. विषय समिती सभापती रबर स्टॅम्प बनले असून प्रशासन जुमानत नसल्याच्या सूर आहे. यातच शहरातील घनकचऱ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने भाजप गटनेत्यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक बोलविली आहे. पक्ष कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता ही बैठक होत आहे.नगरपरिषदेची घडी मागील पाच वर्षापासून विस्कटलेली आहे. पालिकेतील अर्थकारणात सर्वात महत्वाचा घटक येथील घनकचरा कंत्राट आहेत. यातूनच मोठी उलाढाल होते. गेल्या अनेक वर्षापासून येथील अर्थकारण याच कंत्राटाभोवती फिरत आहे. अप्रत्यक्षरीत्या यात अनेकांचे हितसंबध अडकलेले आहेत. त्यात बाजार वसुली, घनकचरा गोळा करणे, रस्ते सफाई यासह इतरही कंत्राटाचा समावेश आहे. हितसंबंधांमुळे प्रशासनावर कोणाचीच पकड नाही. याचा परिणाम शहरातील स्वच्छतेवर होत आहे. हितसंबंध दुखावले गेल्यानंतर कंत्राटदाराची बिले अडविली जातात. याचा थेट परिणाम शहर स्वच्छतेवर होतो. आता कोरोना विषाणू संसर्गाचे संकट असल्याने प्रत्येक नागरिक साठलेल्या घनकचऱ्याबाबत तक्रार करत आहे. या तक्रारींना सामान्य नगरसेवकांनाच तोंड द्यावे लागते. अनेक जण स्वत:च्या खिशातून जनतेची सेवा करण्याइतके सक्षम नाहीत किंवा त्यांना तसे मार्ग अजूनही सापडले नाहीत. अशा नगरसेवकांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.रविवारच्या बैठकीत विविध मुद्दांवर चर्चा केली जाणार आहे. नगरसेवकांना वॉर्डात काम करताना येणाºया अडचणी मांडणे, पक्षाची अधिकृत भूमिका घेऊन पालिकेत काम करणे यावर चर्चा होणार आहे.सर्वसाधारण सभेची सदस्यांना प्रतीक्षाचकोरोना विषाणू संसर्गामुळे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा झाली नाही. पुढे ही सभा केव्हा घेतली जाईल, याबाबत शाश्वती नाही. अशा स्थितीत नगरसेवकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी व त्यावर चर्चा करण्याकरिता भाजप गटनेते विजय खडसे यांनी रविवारची बैठक आयोजित केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपा