शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत पोटनिवडणुकीत भाजपाने राखला गड

By admin | Updated: January 12, 2016 02:15 IST

झरी पंचायत समितीच्या मुकुटबन गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली.

सुरेश मानकर विजयी : शिवसेना दुसऱ्या क्रमांकावरमुकुटबन : झरी पंचायत समितीच्या मुकुटबन गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर भाजपाचे उमेदवार सुरेश मानकर हे ९८१ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपाने ही जागा कायम राखण्यात यश मिळविले.भाजपाचे येथील विद्यमान सरपंच शंकर लाकडे यांनी राजीनामा दिल्यामुळे झरी पंचायत समितीच्या मुकुटबन गणासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. भाजपातर्फे सुरेश मानकर, शिवसेनेतर्फे संदीप विंचू, काँग्रेसतर्फे करमचंद बघेले, तर राष्ट्रवादीतर्फे डॉ.नेताजी पारशिवे यांनी पोटनिवडणूक लढविली. या निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी अगदी कमी असल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही.ही जागा पूर्वी भाजपाकडेच होती. सध्या केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या सुरेश मानकर यांना निवडून दिले. मतमोजणीत एकूण १७ केंद्रांतून सलग पाचही फेरीत भाजपा उमेदवार आघाडीवर होता. त्यांनी शिवसेना व काँग्रेसचे समीकरण बिघडविले. भाजपाचे सुरेश मानकर यांना तीन हजार ३१५, शिवसेनेचे संदीप विंचू यांना दोन हजार ३३४, काँगे्रसचे करमचंद बघेले यांना दोन हजार १०३, तर राष्ट्रवादीच्या डॉ.नेताजी पारशिवे यांना केवळ ४९६ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपाचे मानकर यांनी शिवसेनेचे विंचू यांच्यापेक्षा ९८१ मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. आमदार संजीवरेड्डी बोदुकरवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या नेतृत्वात झरी नगरपंचायतीनंतर भाजपाने पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीतही बाजी मारली. त्यामुळे भाजपाला आपला गड कायम राखता आला आहे. या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, तर राष्ट्रवादीचे उमेदवार चौथ्या स्थानावर राहिले. निकाल घोषित झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. (शहर प्रतिनिधी)