शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर्यंत बँकांचा व्यवहार बंद राहणार आहे.

ठळक मुद्देबँकांचा संप : एटीएम रिकामे, व्यवहारांसाठी सोमवारची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात देशभरातील बँकांनीसंप पुकारला आहे. यामुळे जिल्ह्यात कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. संपाच्या पहिल्याच दिवशी एटीएमवर रांगा लागल्याने दुपारनंतर एटीएम रिकामे झाले.राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण थांबवा, वेतनवाढीचा करार करा, पाच दिवसांचा आठवडा करा आदी मागण्यांसाठी नऊ संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात स्टेट बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारीही संप कायम राहणार आहे. यामुळे सोमवारपर्यंत बँकांचा व्यवहार बंद राहणार आहे.शुक्रवारी दिवसभर एटीएममध्ये चिक्कार गर्दी होती. नंतर एटीएमही रिकामे झाले. अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. महाराष्ट्र बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापन आणि केंद्र शासनाविरोधात निदर्शने केली. यावेळी रवींद्र विरकर, नितीन सुलभेवार, संतोष पंधरे, गिरीधर खडसे, क्रिष्णा बनसोड, प्रियंका भगत यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.लागोपाठ तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने कर्मचारी, व्यापाऱ्यांसह सामान्य जनतेचे व्यवहार रखडणार आहे. सर्वांनाच सोमवारपर्यंत बँक व एटीएममधून पैसे काढणे दुरापास्त होणार आहे. एटीएममध्ये ठणठणाट असल्याने अनेकांचे व्यवहार खोळंबल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.कापूस चुकारे अडकलेशेतकºयांचे चुकारे राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र संपामुळे चुकारे मिळविण्यासाठी शेतकºयांना सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :bankबँकStrikeसंप