शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी घंटागाड्या नगरपरिषदेवर धडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

शहरातील कचरा संकलनासाठी ६५ घंटागाड्या सुरू आहेत. यावर कार्यरत चालकांना वेळेत वेतन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून घंटागाड्या थेट नगरपरिषद कार्यालयासमोर लावल्या होत्या. यापूर्वी संपूर्ण पावसाळ््यात कचरा डेपोची जागा नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले होते. आता वेतन नसल्याने कचरा संकलन बंद झाले आहे.

ठळक मुद्देचालकांचा संप : यवतमाळ शहरात पुन्हा कचराकोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगपरिषदेचा एकूण कारभार आर्थिक दिवाळखोरीत असल्याने येथे दैनंदिन कामासाठीसुध्दा पैसा शिल्लक नाही. त्यामुळे वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा ठप्प होत आहे. विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपला विरोधक कचरा कोंडीसाठी जबाबादार धरत आहेत. तर दुसरीकडे वेतन नसल्याने घंटागाडी चालकांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू केले होते.शहरातील कचरा संकलनासाठी ६५ घंटागाड्या सुरू आहेत. यावर कार्यरत चालकांना वेळेत वेतन न मिळाल्याने त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले असून घंटागाड्या थेट नगरपरिषद कार्यालयासमोर लावल्या होत्या.यापूर्वी संपूर्ण पावसाळ््यात कचरा डेपोची जागा नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले होते. आता वेतन नसल्याने कचरा संकलन बंद झाले आहे. नगरपरिषदेतही भाजपची सत्ता असून येथील कारभार पूर्णत: ठेपाळल्याचा आरोप सात्याने होत आहे. अनेक चुकीच्या निर्णयामुळे पालिका आर्थिक दिवाळखोरीत निघाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. स्वच्छताच नव्हे तर इतर ही कंत्राटदारांचे देयके देण्याची सोय नगरपरिषदेकडे नसल्याचे सांगितल्या जात आहे.निवडणुकीत विरोधकांना आयता मुद्दाविधानसभा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. तसेही प्रचारामध्ये शहरात तुंबलेला कचरा, पाणी, रस्त्याची समस्या चांगली गाजत आहे. त्यावरून विरोधक सत्ताधारी उमेवाराला लक्ष्य करत आहे. आता पुन्हा घंटागाड्या बंद झाल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे.तासाभरातच आंदोलनाची दखलघंटागाडी चालकांनी वेतनासाठी यापूर्वी पोळ्याच्या सणाला आंदोलन केले होते. तेव्हा पालिकेने याची आपल्या सोईने दखल घेतली. मात्र बुधवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन तातडीने दुपारी ४ वाजता थांबविण्यासाठी हालचाली आरोग्य विभाग प्रमुख प्रवीण उंदरे, नगरसेवक प्रवीण प्रजापती व कंत्राटदार यांनी चालकांना वेतन देण्याचे आश्वासन दिले. शिवाय कंत्राटदाराकडून तसे लेखी स्वरूपात घेतल्याने आंदोलन मिटले. निवडणुकीच्या रणधुमाळीत मुद्दा चिघळू नये याची दक्षता भाजपकडून घेण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका