शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
7
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
8
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
9
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
10
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
11
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
12
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
13
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
14
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
15
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
16
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
17
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
18
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
20
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा आता तरी वाजवा ! विद्यार्थी, शिक्षक, पालक सारेच बेचैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 05:00 IST

गेल्या दीड वर्षांपासून नर्सरी, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा बंद आहे. शहरी भागातील उच्च माध्यमिकचे वर्गही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही प्रचंड अस्वस्थ झाले आहे. शाळा नसल्याने दिवसभर रिकाम्या राहणाऱ्या मुलांचे काय करावे असा पेच पालकांपुढे निर्माण झाला आहे. त्यातून विविध सामाजिक समस्याही उद्‌भवण्याचा धोका वाढला आहे. शासनाने विविध कार्यक्रम, लग्न सोहळे, बाजारपेठेला मुभा दिलेली असताना शिस्तीत चालणाऱ्या शाळांनाच का बंदी घातली असा प्रश्न पुढे आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यात जमा आहे. जिल्ह्यातही कोरोनाचे नवीन रुग्ण आढळणे जवळपास थांबले आहे. त्यामुळे आता तरी शाळा नियमित सुरू कराव्या, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये वर्ग भरविणे सुरू झाल्यामुळे या मागणीला जिल्ह्यातून अधिकच जोर चढला आहे. गेल्या दीड वर्षांपासून नर्सरी, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा बंद आहे. शहरी भागातील उच्च माध्यमिकचे वर्गही बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकही प्रचंड अस्वस्थ झाले आहे. शाळा नसल्याने दिवसभर रिकाम्या राहणाऱ्या मुलांचे काय करावे असा पेच पालकांपुढे निर्माण झाला आहे. त्यातून विविध सामाजिक समस्याही उद्‌भवण्याचा धोका वाढला आहे. शासनाने विविध कार्यक्रम, लग्न सोहळे, बाजारपेठेला मुभा दिलेली असताना शिस्तीत चालणाऱ्या शाळांनाच का बंदी घातली असा प्रश्न पुढे आला आहे. मात्र प्रशासन जपून पावले टाकत आहे. 

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण ?- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. शाळा सुरू झाल्यावरही ही प्रक्रिया नियमित करावी लागणार आहे. मात्र त्याचा खर्च कसा भागवावा हा पेच शाळांपुढे आहे. 

- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्येही शंभर टक्के शिक्षकांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. - याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबरलाच आदेश काढला. मात्र  विद्यार्थ्यांनाही बोलावून शाळा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

मुख्याध्यापकांसमोर पेच- कोविड नियमांमुळे जो खर्च करावा लागणार आहे, त्यासाठी प्रशासनाने  निधी पुरवावा किंवा त्या सुविधाच पुरवाव्या. शाळांचा बंद असलेला सादिल निधी द्यावा, अशी मागणी पालिका शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे यांनी नोंदविली. 

जिल्हाधिकारी म्हणतातप्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत अजून तरी आमच्यापर्यंत कोणताही निर्णय आलेला नाही. शासनाच्या मार्गदर्शनानुसारच शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

शिक्षणाधिकारी म्हणतातप्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत सध्याच कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र शंभर टक्के शिक्षकांनी शाळेत पूर्णवेळ हजर राहणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. - प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा