शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे काढण्यासाठी पुसदमध्ये बँका हाऊसफुल्ल

By admin | Updated: November 16, 2016 00:32 IST

शासनाने पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याचा ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून निर्णय घेऊन तब्बल आठ दिवस उलटले तरी

नोटांचा तुटवडा : एटीएममध्येही ग्राहकांच्या लांबचलांब रांगापुसद : शासनाने पाचशे व हजारांच्या नोटा रद्द करण्याचा ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून निर्णय घेऊन तब्बल आठ दिवस उलटले तरी अद्यापही पुसदमधील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी दिसून येत आहे. सोमवार १४ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंतीनिमित्त बँकांना सुटी होती. मंगळवारी बँका उघडल्यानंतर ग्राहकांनी डिपॉझिट, विड्रॉल व जुन्या नोटा बदलण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळे बँकासह एटीएमसमोरही नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बँकांमध्ये २०, ५०, १००, ५०० व २००० रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने अनेक शाखांमध्ये विड्रॉलची मर्यादा कमी करण्यात आली. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेने तर केवळ एक हजाराचा विड्रॉल देण्यात येत आहे. तर स्टेट बँकेच्या शाखेत प्रवेशासाठी एकच रांग व विड्रॉल, डिपॉझीट, एक्स्चेंजसाठी वेगळे काऊंटर नसल्याने एकच गोंधळ उडाला. पाचशे व हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने जुन्या नोटा एक्स्चेंज करण्यासाठी व नवीन चलन घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील भारतीय स्टेट बँक, पुसद अर्बन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, युनीयन बँक आदी ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. आठव्या दिवशीही ग्राहकांनी बँकांसह एटीएमसमोरही लांबच लांब रांगा लावल्या. नागरिकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र सर्वदूर पाहावयास मिळाले. येथील स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहकांसाठी वेगवेगळे काऊंटर नसल्याची नागरिकांची ओरड संताप पाहायला मिळाला. (प्रतिनिधी)