शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडाच्या बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार ढेपाळला

By admin | Updated: September 12, 2016 01:25 IST

येथील बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक दिक्षीत यांची बदली ...

ग्राहक वैतागले : कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार, वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचेही प्रमाण वाढलेपांढरकवडा : येथील बँक आॅफ महाराष्ट्रचा कारभार सध्या कमालीचा ढेपाळला आहे. येथील व्यवस्थापक दिक्षीत यांची बदली झाल्याने नव्याने रूजू झालेल्या व्यवस्थापकाचे नियंत्रण कर्मचाऱ्यांवर नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कमालीचे वैैतागले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर बँक आॅफ महाराष्ट्र ही गोरगरिब, सर्वसामान्य, शेतकरी व शेतमजुरांची बँक समजली जाते. या शाखेतील कर्मचारी ग्राहकांशी अरेरावी करून उद्धट वागणूक देत असून ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. येथील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमालीची घटली असून त्याचा परिणाम बँकेच्या कामकाजावर होताना दिसून येत आहे. बँकेत आलेल्या ग्राहकांची कामे तडकपणे निपटवून मोकळी न करता बँकेत विनाकारण गर्दी जमविली जाते. आधीच ही बँक कमी जागेत चालविली जात असल्यामुळे गर्दी झाल्यास तेथे उभेसुद्धा राहायला जागा नसते. कामाची गती वाढविल्यास गर्दी त्वरित पांगविता येते, हे बँकेला वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील ग्राहकांची हेळसांड होत आहे. या बँकेत मोठ्या प्रमाणात शहरी व ग्रामीण ग्राहकांचा भरणा असल्यामुळे बँकेत अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. असे झाल्यास येथील कर्मचाऱ्यांवर वचक राहिल, असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. पासबुकात एंट्री करणे, नवीन खाते उघडणे, खाते उतारे, चेक कलेक्शन, विविध कर्ज प्रकरणे, फायनान्सची कामे घेऊन विविध ग्राहक बँकेत येतात. त्यांची कामे रेंगाळत असल्यामुळे त्यांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. शेतकरी, शेतमजुर मजुरी बुडवून बँकेत कामानिमित्त येतात व त्यांना विविध कारणे सांगून परत पाठविले जाते. वृद्ध व निराधार ग्राहकांनादेखिल मनस्ताप सहन करावा लागत आहे. वृद्ध व निराधारांसाठी वेगळे काऊंटर ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दररोज कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असलेल्या या बँकेत वारंवार वीज व इंटरनेट सेवा खंडित होण्याचे प्रकारही घडत आहे. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण ताटकळत राहावे लागते. असे प्रकार सध्या वाढीस लागले असून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. (वार्ताहर)