शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

बँक एटीएमची सुरक्षा आऊट सोर्सिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम फोडून २८ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली होती. हा गुन्हा पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. उत्तरप्रदेशातील टोळीला अटक केली. या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक वास्तव हाती लागले. बँकांकडून एटीएममध्ये ठेवली जाणारी लाखो रुपयांची रोकड अगदीच बेवारस असते.

ठळक मुद्देजिल्ह्यात १९३ एटीएम : एजंसीकडून सुरक्षेच्या खर्चाला कात्री, उपाय तोकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात विविध बँकांचे एटीएम आहेत. जवळपास १९३ एटीएम बँकांनी ग्राहकांच्या सेवेत उघडले आहेत. एटीएमचा संपूर्ण कारभार सर्वच प्रमुख बँकांकडून आऊट सोर्सिंगद्वारे चालविला जातो. केवळ रोकड भरण्यापुरताच बँकेचा संबंध एटीएमशी येतो. आऊट सोर्सिंगवर एटीएमची देखभाल व इतर सुविधा देणाऱ्या एजंसीकडून सुरक्षेच्या खर्चाला कात्री लावली जाते. याचाच फायदा थेट चोरट्यांना होत आहे. अनेकदा शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी एटीएम फोडण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले.पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम फोडून २८ लाखांची रोख चोरट्यांनी लंपास केली होती. हा गुन्हा पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. उत्तरप्रदेशातील टोळीला अटक केली. या तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक वास्तव हाती लागले. बँकांकडून एटीएममध्ये ठेवली जाणारी लाखो रुपयांची रोकड अगदीच बेवारस असते. जिल्ह्यातील बहुतांश बँकांनी ईपीएस, ब्रिंग्स, सीएमएस या सारख्या अनेक एजंसीजकडे एटीएमची जबाबदारी सोपविली आहे. सर्वाधिक ६८ एटीएम ईपीएस एजंसीकडे आहे. या एजंसींनी त्यांच्या हाताखाली आणखी काही एजंसीची सेवा घेतली आहे. यात रायटर सेफ गार्ड, लॉजी कॅच या सारख्या एजंसीज रोख रक्कम एटीएममध्ये भरण्याचे काम करतात.प्रत्यक्षात एटीएमवर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असणे आवश्यक आहे. बँकांकडून आऊट सोर्सिंग करताना तसा करारही केला जातो. शहरातीलच काय निर्जनस्थळी असलेल्या एटीएमजवळही सुरक्षा रक्षक अपवादानेच पहायला मिळतो. केवळ सीसीटीव्ही कॅमेरे व काही ठिकाणी अलार्म सिस्टीम लावलेली असते. या व्यतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीच उपाययोजना केली जात नाही. याचाच फायदा चोरटे घेतात. बँकांचा पैसा असला तरी ती राष्ट्रीय संपत्ती आहे. लाखो रुपयांची रक्कम बेवारसरीत्या एटीएममध्ये ठेवली जात असल्याचे वास्तव पोलीस तपासात उघड झाले.पूर्णवेळ चौकीदार, अलार्म सिस्टीम आवश्यकयवतमाळ शहरातील वर्दळीच्या भागात असलेले एटीएम फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. सुदैवाने त्यात चोरट्यांना यश आले नाही. एटीएम सुविधेसाठी बँका ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करतात. मात्र त्याच ग्राहकाच्या पैशाची सुरक्षा करण्याकडे अप्रत्यक्षरीत्या बँकांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. बँकांनी एटीएमच्या ठिकाणी पूर्णवेळ चौकीदार, अलार्म सिस्टम बसविणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चोरी किंवा इतर घटना घडल्यानंतर पोलिसांवरच त्याचा दबाव आणला जातो. प्रत्यक्षात प्रतिबंधासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. याबाबत पोलीस प्रशासनाने ग्राहकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत.

टॅग्स :atmएटीएम