शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

संदेशला दोन वर्षांपासून आश्रय देणारी ऑन्टी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

काम नसल्याने तो पूर्णवेळ मोबाईलवर राहून अनन्यासिंग ओबेरॉय हिच्या नावाचे अकाऊंट ऑपरेट करीत होता. या अकाऊंटवर तो अनन्यासिंग हिला हायप्रोफाईल मॉडेल दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी तो विविध प्रकारचे फोटो प्रोफाईलवर शेअर करीत होता. यात त्याला पुरेपूर यश मिळाले. अनेक उच्चभ्रू व्यक्ती सोशल मीडियावर अनन्यासिंगच्या फ्रेन्डलिस्टमध्ये समाविष्ट झाल्या. यातून त्याने मैत्री वाढवत नेली. व्यावसायिक व्यक्तींमध्ये मध्यस्थाची भूमिकाही त्याने बजावली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोशल मीडियावर अनन्यासिंग ओबेरॉय या मॉडेलच्या नावाने हायप्रोफाईल व्यक्तींना गंडा घालणाऱ्या संदेश अनिल मानकर या ठगाला आश्रय देणारी दारव्हा रोडवरील कुंटणखाना चालक ऑन्टी पसार झाली आहे. संदेश हा सुरुवातीला एका हॉटेलात प्लेट धुण्याचे काम करीत होता. नंतर तो दूरची नातेवाईक असलेल्या कुंटणखाना चालक ऑन्टीच्या संपर्कात आला. तो पूर्णवेळ त्या कुंटणखान्यावर राहत होता. तिथेच त्याने व्यवसाय करणाऱ्या महिला, मुली ग्राहकांशी कसा संवाद साधतात हे ग्रहण केले. काम नसल्याने तो पूर्णवेळ मोबाईलवर राहून अनन्यासिंग ओबेरॉय हिच्या नावाचे अकाऊंट ऑपरेट करीत होता. या अकाऊंटवर तो अनन्यासिंग हिला हायप्रोफाईल मॉडेल दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. यासाठी तो विविध प्रकारचे फोटो प्रोफाईलवर शेअर करीत होता. यात त्याला पुरेपूर यश मिळाले. अनेक उच्चभ्रू व्यक्ती सोशल मीडियावर अनन्यासिंगच्या फ्रेन्डलिस्टमध्ये समाविष्ट झाल्या. यातून त्याने मैत्री वाढवत नेली. व्यावसायिक व्यक्तींमध्ये मध्यस्थाची भूमिकाही त्याने बजावली आहे. दिल्लीतील डॉक्टर पूर्वी संदेशने दोघांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. ८३ लाखांची रोख घेऊन निघालेला व्यावसायिक मधातच पोलिसांच्या हाती लागला. तर एकाकडून दोन लाख रुपये येणार असतानाच काम बिचकले. त्यानंतर संदेश अतिशय सावध राहू लागला, त्याने दिल्लीच्या डॉक्टरसोबत केवळ निखळ मैत्री कायम ठेवली. त्यात कुठेही अश्लीलता व लैंगिकता येऊ दिली नाही. यातूनच मैत्रीचे भावनिक नाते तयार झाले. डॉक्टरकडून भेट स्वरूपात घेतलेले दागिने विकण्यासाठी संदेश नागपुरात गेला होता. तेथे त्याने दागिने विकून दोन लाख रुपये किंमतीचा महागडा मोबाईल खरेदी केला. आता तो आणखीच सराईतपणे अनन्यासिंग या मॉडेलचे सोशल मीडिया अकाऊंट हाताळू लागला. 

मोबाईलच्या एसडीआर, सीडीआरनुसार पोलीस तपास - पोलिसांनी या प्रकरणात संदेशने कुणाला गंडा घातला याचा शोध घेत आहे. केवळ संदेशच्या जबाबावर पोलीस संतुष्ट नसून दुसरी बाजूही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी मोबाईलवर आलेले कॉल, सोशल मीडियावर केलेली चॅटींग यासह इतर सर्व प्रकारचा तपास केला जाणार आहे. याकरिता एसडीआर, सीडीआर ताब्यात घेण्यात आला आहे. याची पडताळणी करून चौकशी केली जाणार आहे.

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅप