यवतमाळात प्रकल्पग्रस्ताकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 12:55 PM2021-08-12T12:55:54+5:302021-08-12T12:56:18+5:30

उमरखेड तालुक्यातील अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने एका संतप्त शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Attempted self-immolation by project victims in Yavatmal; Police vigilance averted disaster | यवतमाळात प्रकल्पग्रस्ताकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

यवतमाळात प्रकल्पग्रस्ताकडून आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: उमरखेड तालुक्यातील अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी ९ आॅगस्टपासून आझाद मैदानावरती उपोषण सुरु केले आहे. या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला मिळाला नाही. 18 वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. या आंदोलनाची दखल न घेतल्याने एका संतप्त शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला.

Web Title: Attempted self-immolation by project victims in Yavatmal; Police vigilance averted disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.