शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 06:00 IST

हैदराबादमध्ये महिला अत्याचार प्रकरणात जी कठोर भूमिका घेतली गेली, तशी कठोर भूमिका महाराष्ट्रातही घेण्याबाबत पावले उचलली जात असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कर्जमाफीऐवजी शेतकरी कर्जफेड असा शब्दप्रयोग सरकारने करावा, असे वक्तव्य डॉ. साळुंखे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा शुक्रवारी येथे किसान काँग्रेसने नागरी सत्कार केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजयाताई धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, विदर्भातील रोजगार निर्मिती, तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांचा विकास, महिलांवरील वाढते अत्याचार, ओबीसींची स्वतंत्र जनगणना अशा विविध मुद्यांवर विचार मांडले. हिंगणघाट येथील घटनेचा आम्ही निषेध करतो. हैदराबादमध्ये महिला अत्याचार प्रकरणात जी कठोर भूमिका घेतली गेली, तशी कठोर भूमिका महाराष्ट्रातही घेण्याबाबत पावले उचलली जात असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कर्जमाफीऐवजी शेतकरी कर्जफेड असा शब्दप्रयोग सरकारने करावा, असे वक्तव्य डॉ. साळुंखे यांनी केले. वामनराव कासावार, ख्वाजा बेग यांनीही यावेळी विचार मांडले.विनोद पटोले, उमेश डांगे, राळेगाव बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई, मिलींद धुर्वे, संजय ठाकरे, हेमंत कांबळे, जावेद अन्सारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केले. सूत्रसंचालन विद्या चिंचोरे यांनी केले.कळंब येथेही सत्कारकळंब : येथील चिंतामणी मंदिरात नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर विकासाची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे आदी उपस्थित होते.शेतकरी कलावंताचाही सन्मानकार्यक्रमात येथील वसंतराव इंगोले या कलावंताने डोक्याने कॅशिओ तर नाकाने बासरी वाजविली. डफाच्या तालावर ‘शेतकरी आरती’ सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार करत १० हजार रुपयांचे पारितोषिकही दिले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले