रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे. या भागात मुबलक पाणी असूनही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.मोहा विभागातील चांदोरेनगर ही सर्वात मोठी वसाहत आहे. या नगरासाठी पाणी पुरवठ्याची स्वतंत्र विहीर ग्रामपंचायतीने दिली होती. हा भाग नगरपरिषदेकडे हस्तांतरित झाला, तेव्हापासून टंचाईची स्थिती गंभीर झाली. पाणी पुरवठा विहिरीला २२ फूट पाणी आहे. या ठिकाणचे मोटारपंप बंद पडला. याबाबत नगरपरिषदेला सूचना केली. मात्र दोन महिन्यापासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता ही मोटर विहिरीत पडली आहे. यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद आहे. प्राधिकरणाच्या नळाचे पाणी नगरात पोहचत नाही. खासगी बोअर आटले. संपूर्ण भिस्त टँकरवरच विसंबून आहे. नगरपरिषदेने या भागतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या नाही. जुनी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी तसदी घेतली नाही.ग्रामीण भागापेक्षाही वाईट अवस्था चांदोरेनगराची असल्याचे मत अर्चना वानखडे, विमल जाधव, सुरेखा साखरकर यांनी व्यक्त केले. या भागात पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. पाण्याचे स्रोत उपलब्ध आहे. असे असतानाही त्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्या जाधव, ताराबाई चंदनकार, वंदना घुले यांनी केला. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. महिन्यात दोन वेळा टँकर आला. २०० लिटर पाणी मिळाले. या पाण्यात काय होणार, असा प्रश्न सविता चावके, रत्नमाला तिखे यांनी उपस्थित केला. पाण्याच्या भीषण टंचाईने गावाकडे जाऊन कपडे धुण्याची वेळ आल्याचे मतही गृहिणींनी नोंदविले.खासगी टँकरही नंबर लावल्यावर येत नाही. त्यासाठी चार ते पाच दिवसाची प्रतीक्षा करावी लागते, असे मत प्राजक्ता बहाड यांनी नोंदविले. पाण्याच्या नियोजनात प्रशासन चुकले आहे. पावसाळ्यानंतर लगेच यावर उपाययोजना व्हायला हव्या होत्या. प्रत्यक्षात तसे घडले नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, असे रेखा चव्हाण, जयमाला तिखे, इंदू थाटे म्हणाल्या. आजपर्यंत कधीही पाण्यासाठी बाहेर जाण्याची वेळ आली नाही. मात्र यावर्षी रात्रीही पाण्यासाठी जावे लागते, असे मत शिवाणी हांडे, सुधा वानखडे, चंदा मार्इंदे, अनिता कवडे यांनी नोंदविले.आपल्या भागातले टँकर बंद झाले का?चांदोरेनगर परिसरात येणाऱ्या टँकरची संख्या घटली आहे. महिन्यात एखादा टँकर चुकून दिसतो. यामुळे या भागात पाण्याचे टँकर येणे बंद झाले काय, असाच प्रश्न या भागात शिरताच नागरिक विचारतात.पाण्यासाठी परीक्षाचयावर्षी प्रत्येक गृहिणीला डोक्यावर गुंड घेऊन लांबवर जाण्याची वेळ आली. पाणीटंचाई आहे म्हणून गाव सोडूनही जाता येत नाही. मुलांच्या परीक्षा आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. यामुळे अनेक गृहिणींची अक्षरश: परीक्षाच सुरू आहे. पुरूष मंडळीला दररोजच्या कामासोबत पाण्यासाठी गावभर फिरावे लागत आहे, असे मत प्रमोद बहाड यांनी व्यक्त केले.
चांदोरेनगरात कृत्रिम टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 23:33 IST
नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या चांदोरेनगराची तहान भागविण्यासाठी प्राधिकरणाच्या नळासोबतच स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही आहे. या नळ योजनेच्या विहिरीला २२ फूट पाणी आहे. तरीही नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाने ही विहीर बंद पडली आहे.
चांदोरेनगरात कृत्रिम टंचाई
ठळक मुद्देपाणी पुरवठा विहिरीकडे दुर्लक्ष, टँकर फिरकेनाप्राधिकरणाचे नळ चढेना, नगर परिषदचे दुर्लक्ष