शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सेना सत्तेतून बाहेर

By admin | Updated: June 15, 2014 23:49 IST

येथील जिल्हा परिषद, पुसद नगर परिषद आणि यवतमाळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती तोडून सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांनी

राष्ट्रवादीशी काडीमोड: जिल्हा प्रमुखांची माहिती यवतमाळ : येथील जिल्हा परिषद, पुसद नगर परिषद आणि यवतमाळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती तोडून सत्तेतून बाहेर पडत असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केली. शिवसेनेचे संपर्क नेते आमदार दिवाकर रावते यांची पत्रपरिषद येथे पार पडली. यावेळी आमदार संजय राठोड यांनी ही घोषणा केली. जिल्हा परिषदेत शिवसेनेने आपल्या बारा सदस्यांचे समर्थन देऊन राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली. यातील शिवसेनेच्या दोन सभापतींनी बंड केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित केल्याचेही आमदार राठोड यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेचे संपर्क नेते आमदार दिवाकर रावते यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार रावते म्हणाले, राज्य शासनाच्या चितळे समितीने तयार केलेला अहवाल सभागृहात सादर करण्यात आला आहे. या अहवालामध्ये स्पष्टपणे अध्यक्ष व सचिव या अपहारास दोषी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कारवाईचे अधिकार समितीला नसल्याने ते शासनाच्या अखत्यारितील बाब आहे. अशा स्थितीत राज्य शासन तत्कालिन जलसंपदा मंत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ही एक प्रकारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खोदून ठेवलेली कबर आहे. या पूर्वी एटीआरनुसार आदर्श घोटाळ्याच्या अहवालाबात फेरचर्चा करण्यात आली होती. आता तोच धागा पकडून नव्याने गठित होणारे सरकार चितळे समितीच्या अहवालावरही पुन्हा चर्चा करू शकते. तेव्हा यात दोषी असलेल्या मंत्री व सचिवांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल. शिवाय राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी केंद्राने पैसा दिला आहे. याची चौकशी केंद्राकडून करण्यात येणार आहे. या बाबतही पाठपुरावा सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले. पत्रकारांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेची राष्ट्रवादीशी असलेली युती तोडणार काय, असे विचारताच या बाबत तत्काळ निर्णय घ्या, अशी सूचना दिवाकर रावते यांनी जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांना केली. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडली असून पाठिंबा काढत असल्याचे पत्र सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही आमदार संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात शिवसेनेची जिल्हा परिषद, पुसद नगरपालिका, यवतमाळ पंचायत समिती राष्ट्रवादीशी युती आहे. येथे पदावर असलेले शिवसेनेचे सदस्य लगेच आपल्या पदाचा राजीनामा देतील. राष्ट्रवादी हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप आमदार संजय राठोड यांनी यावेळी केला. यानंतर पत्रकारांनी दिवाकर रावते यांच्याकडे यवतमाळ शहरातील पाणीपुरवठ्याच्या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली. याची माहिती नसल्याचे सांगत रावते यांनी केंद्राच्या योजनेतून हे काम सुरू असेल तर खासदार गवळी यांनी तातडीने पाठपुरावा करावा, अशी सूचना त्यांना द्यावी, असे आमदार राठोड यांना सांगितले. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, बाळासाहेब मुनगिनवार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)