लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील खडका येथील ग्रामस्थांनी गुरूवारी पाणीटंचाई निवारणासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढून धडक दिली.खडका ग्रामस्थ तीव्र पाणीटंचाईमुळे त्रस्त झाले आहे. गावात तीन महिन्यापासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिसरातील पाच गावांसाठी प्रशासनाने तीन टँकर सुरू केले. ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करतात. मात्र हे टँकर अपुरे ठरत असल्याने अतिरिक्त टँकर सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी अॅड.मोघे यांच्या नेतृत्वात तहसीलवर घागर मोर्चा काढला. येथील तहसील कार्यालयासमोरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली.मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध करीत घोषणाबाजी केली. माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत जयस्वाल, बाळासाहेब शिंदे, पिनू पाटील, खडकाचे सरपंच कृष्णा कनाके, अंबिका महल्ले, विष्णू कुडमते, अनिल आडे, अहमद तंवर, सुरेश महल्ले, धोंडीव मेश्राम, मोहन पवार, मधुकर केराई, प्रदीप वाकोडे, बालाजी केराई, प्रमोद जाधव, अनुसया अक्कलवार, जनाबाई केराई, उज्ज्वला केराई, बेबी खडसे, मंगला मेश्राम, लक्ष्मी राठोड आदींसह खडका येथील महिला, पुरुष मोर्चात सहभागी होते.मोर्चा तहसील कार्यालयात धडकताच महिलांनी तेथे घागरी फोडून शासन आणि प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. टँकर सुरू केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा दिला. अखेर सभापती सूर्यकांत जयस्वाल, मंगळ अधिकारी पी.एस.चव्हाण, प्रभारी ठाणेदार रवींद्रनाथ भंडारे आदींनी त्वरित दोन टँकर सुरू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर मोर्चेकºयांनी आंदोलन मागे घेतले.
आर्णी तहसीलवर घागरी फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:01 IST
तालुक्यातील खडका येथील ग्रामस्थांनी गुरूवारी पाणीटंचाई निवारणासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढून धडक दिली.
आर्णी तहसीलवर घागरी फोडल्या
ठळक मुद्देखडकावासीयांचा पाण्यासाठी मोर्चा : शिवाजीराव मोघेंचे नेतृत्व