कन्टेनरमधून जनावर तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:52 IST2018-05-11T23:52:51+5:302018-05-11T23:52:51+5:30
खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

कन्टेनरमधून जनावर तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी/मंगरुळ : खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तब्बल दीडशे जनावरांची सुटका करण्यात आली.
राज्यात गोवंश वाहतूक आणि हत्येला बंदी आहे. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात जनावरांची वाहतूक केली जाते. या चोरट्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांसह सामाजिक संस्थाही पुढाकार घेत आहे. त्यामुळे अशी वाहतूक करणे तस्करांना कठीण झाले. त्यावर आता त्यांनी नामीशक्कल लढविली आहे. बंदीस्त कन्टेनरमध्ये ३० ते ३५ जनावरे भरुन त्याची वाहतूक केली जाते. कन्टेनर बंदीस्त असल्याने कुणालाही संशय येत नाही. परंतु याचे बिंग शुक्रवारी फुटले. नागपूरवरून आदिलाबादकडे जाणारे पाच ट्रक बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू जगताप यांच्या मार्गदर्शनात मंगरुळ व बारडतांडा येथे अडविण्यात आले. कन्टेनर उघडले असता त्यात तब्बल दीडशेच्यावर जनावरे आढळून आली. अत्यंत दाटीवाटीने ही जनावरे कोंबली होती. या सर्व जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी दिग्रस येथील गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. पाच कन्टेनर जप्त करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह््यात पहिल्यांदाच कन्टेनरमधून जनावरांची वाहतूक उघडकीस आली. यामुळे आतापर्यंत अशा पद्धतीने अनेक जनावरांची तस्करी झाली असावी.