शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

धुळीमुळे गुदमरतोय सर्वांचाच जीव

By admin | Updated: May 27, 2015 02:24 IST

वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे.

श्वसन, डोळ्यांचे आजार : प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजनांची निर्माण झाली गरजनांदेपेरा : वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वादळ, वारा सुटतो. वाऱ्याचे गोल भवरे अनेकदा तयार होतात. या भवऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण असतात. ते वाऱ्याबरोबर उंच आकाशात उडतात. हीच धूळ वाहनधारकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. धूळ उडाल्यानंतर वाहनधारकांना वाहन चालविताना समोरचे काहीच दिसत नाही. एवढ्या प्रमाणात हवेत धूळ असते. या धुळीमुळे आता नागरिकांना श्वसन व डोळ्यांचे आजार निर्माण होण्याची शक्यताही बळावली आहे. मात्र या धुळीबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी चुप्पी साधून आहेत. तालुक्यात अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून दररोज हजारो टन कोळशाचे उत्खनन केले जाते. हाच कोळसा विविध वाहनांव्दारे संबंधित कोलडेपो, रेल्वे सायडींगरव पोहोचविला जातो. कोळशाची वाहतूक करताना वाहनातून काही प्रमाणात कोळसा रस्त्याच्या आजूबाजूला सांडतो. त्यावरून इतर वाहने जातात. त्यामुळे त्या कोळशाची बारीक भुकटी तयार होते. ती वातावरणात पसरते. याच भुकटीवरून एखादे वाहन गेल्यास ती धूळ उडून नागरिकांच्या शरीरात जाते. चिखलगाव, लालगुडा, नांदेपेरा बायपासवरून कोळशाचे ओव्हरलोड ट्रक दररोज धावतात. या परिसरात ही धूळ नेहमी साचून असते. रस्त्यावर धुळीचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. या मार्गावरून वाहने जाण्याची संख्या अधिक आहे. दिवस-रात्र कोळशाचे वाहन या रस्त्यावरून कायम धावत राहतात. त्यामुळे दुचाकी वाहनधारकांना वाहन चालविणे, तर अगदी कठीण झाले आहे. समोरून जड वाहन गेल्यानंतर दुचाकीधारकांना थोडी वाट बघूनच पुढे मार्गक्रमण कराव लागत आहे.ही समस्या नवीन नाही. या धुळीबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारीही दिल्या. मात्र रस्ते व्यवस्थित साफ केले जात नाही. वेकोलिकडून रस्त्यावर पाणी शिंपडले जात नाही. त्यांनी रस्त्यांवर पाण्याचा शिडकाव करणे आवश्यक आहे. मात्र पाण्याचा शिडकावच जात नाही. परिणामी ही धूळ नाका-तोंडात, डोळ्यांत जात असल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या धुळीमुळे नागरिकांना श्वसन, डोळ्यांचे व इतर आजार बळावत आहेत. (वार्ताहर)