शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद

By admin | Updated: February 17, 2017 02:34 IST

भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर व महिला शाखेच्यावतीने येथे १० व ११ मार्च रोजी चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.

घाटंजी : भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर व महिला शाखेच्यावतीने येथे १० व ११ मार्च रोजी चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रबोधन, धम्म कविसंमेलन, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार, नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता भदन्त सदानंद यांच्या अध्यक्षतेत भदन्त संघरत्न माणके यांच्या हस्ते उद्घाटन होईल. भदन्त अश्वजित हे ध्वजारोहण करतील. भदन्त बुद्ध घोष, भदन्त धम्मवंश, भदन्त विपश्शी, आर्या सुकेशनी, भिक्खुनी आर्या बुद्धकन्या यांची उपस्थिती राहील. याच दिवशी आंबेडकरी जलसा, गायन आणि प्रबोधनपर कार्यक्रम होईल. दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील धम्मक्रांती या विषयावर मार्गदर्शन होईल. सायंकाळी ५ वाजता धम्म कविसंमेलन, ७ वाजता एकसंज्ञा निळ्या पाखरांची हा कार्यक्रम होणार आहे. ११ मार्चला सकाळी १० वाजता बुद्ध वंदना व धम्मदेसना भिक्खुसंघ देतील. दुपारी १ वाजता भदन्त एन. चंद्ररतन थेरो, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, भदन्त नागदीपांकर मार्गदर्शन करतील. दुपारी ३.३० वाजता समारोपीय सत्र व सत्कार सोहळा होईल. या कार्यक्रमात नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर, उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाईल. सायंकाळी ७ वाजता ‘अंगुलीमाल’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ७.३० वाजता बुद्ध-भीत गीतांवर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम होईल. या संपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची विनंती आयोजन समितीचे अध्यक्ष संतोष जीवने, महासचिव सतीश रामटेके, कार्याध्यक्ष अशोक निमसरकर, कोषाध्यक्ष गुलाब सिसले, शहराध्यक्ष डॉ. जयंत गायकवाड, शहर महासचिव प्रा. उत्तम शेंडे, प्रकाश डोंगरे, शेषराव नगराळे, मोतीराम बन्सोड, मुख्य निमंत्रक डॉ. आनंदराव कांबळे, नारायण धोटे, राजू कुंभारे, राजू नारायणे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)